25.3 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriचरायला सोडलेल्या गुरांची चोरी करून बेकायदा वाहतूक

चरायला सोडलेल्या गुरांची चोरी करून बेकायदा वाहतूक

गुरे तस्करीची गाडी सापडल्यामुळे जांभुळ फाटा येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चरायला सोडलेल्या गुरांची चोरी करून बेकायदा वाहतुक करण्याचा प्रकार उघडकीस आला. तालुक्यात मिरजोळे जांभुळ फाटा येथे गावातील लोकांनी त्यांची गाडी अडवुन ठेवली होती. गाडीचा हौदा काळ्या ताडपत्रीने झाकण्यात आला होता. ताडपत्री उघडुन पाहिल्यावर लक्षात आले बेल संशयित रित्या तोंडीला दोरीने करकचुन बांधुन ठेवण्यात आले होते. त्यांना ओरडता येऊ नये अशा पध्दतीने त्यांचे तोंड बांधुन ठेवले होते. गुरुवार सकाळी ११ च्या दरम्यान हा प्रकार उघडकीला आला. मिरजोळे जांभुळ फाटा येथुन गुरांची गाडी भरुन जात असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजली. ताबडतोब ते घटनास्थळी पोहोचले. कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन केला. पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले.

गुरे तस्करीची गाडी सापडल्यामुळे जांभुळ फाटा येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाडी व चालक मालक यांना शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. यामध्ये महेश श्रीधर सावंत उर्फ बाबा सावंत आणी मनोज दिनकर लिंगायत दोघेही रहाणार पाली साठरेबांबर यांच्यावर भारतीय दंड संहीता १८६० कलम ३४, मोटर वाहन अधिनियम १९८८ कलम ६६/१९२, मोटर वाहन अधिनियम १९५१ कलम ११९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११-१, ११-१व, ११-१स, ११- १ल महाराष्ट्र पशुसंरक्षण अधीनीयम १९७६ कमल ५ २, ९ अन्वये गुन्हा दखल करण्यात आला. याच वेळी या गुरांचे मालक तेथे उपस्थीत झाले. यामुळे ती गुरे चोरून नेण्यात येत होती, असेही निष्पन्न झाले. दोन्ही गुरांच्या मालकांनी गुरांची ओळख पटवुन चोरीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी तक्रार अर्ज दिले. यावेळी अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

Most Popular