26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeKhedरेशन धान्य वितरण प्रणालीत महत्त्वाचा बदल…

रेशन धान्य वितरण प्रणालीत महत्त्वाचा बदल…

डोळ्यांची बुबुळे स्कॅन करणाऱ्या नवीन ई पॉस मशिन्स उपलब्ध आहेत.

शिधावाटप केंद्रावरील धान्य वितरण प्रणालीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. नवीन बदल या महिन्यापासून अंमलात आणला जाणार आहे. या बदलामुळे धान्य वितरण करताना लाभार्थ्यांचे प्रम ाणीकरण अधिक सुलभ होणार आहे, तर धान्य वितरण करताना अधिक पारदर्शकता येणार आहे. तसेच रेशन धान्य दुकानदारांच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फतं ई- पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रीक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

त्यानुसार राज्यात २०१७मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठ्याद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ. समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळ्यांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

यासाठी खिळी डलरपपशी हे उपकरण ई पॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई केवायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता आहे. शिधावाटप केंद्रावर धान्य वितरण करताना डोळ्यांद्वारे लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण करणे शक्य होणार आहे. डोळ्यांची बुबुळे स्कॅन करणाऱ्या नवीन ई पॉस मशिन्स रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. धान्य वितरणात सुलभता यावी आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे प्रमाणिक सुलभ व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular