28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplunचिपळूण उक्ताड पुलावर अपघात, एक गंभीर जखमी

चिपळूण उक्ताड पुलावर अपघात, एक गंभीर जखमी

दोन्ही वाहने वेगात असल्याने, धडकेचा आवाजच एवढा मोठा होता कि, आजूबाजूच्या परिसरातील धावतच अपघात स्थळी आलेत.

जिल्ह्यात महामार्गावर सुरु असलेली बांधकामे, लहान सहान डागडुजी यामुळे अपघाताच्या घटना घडतच आहेत. रोज एकतर घाट मार्गावर तर काही ठिकाणी अरुंद रस्ते, पुलाची कामे यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. आणि काही ठिकाणी जीवितहानी देखील घडत आहे.

चिपळूण शहरातील उक्ताड पुलावर बुधवारी रात्री मोटार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मोटारीचा चक्काचूर झाला आहे. मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. जखमीला तत्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथे पाठवण्यात आले.

गोवळकोट येथील अमजद घारे वय ४५ हे आपल्या दुचाकीवरून रात्री गोवळकोटच्या दिशेने निघाले होते. उक्ताड येथील पुलावर ते आले असता समोरून मोटारीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की अमजद घारे हे कित्येक फूट लांब फेकले गेले. त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला तर मोटारीच्या दर्शनी भागाचे देखील चुराडा होऊन नुकसान झाले.

सफन परकार रा. गोवळकोट रोड हे मोटार चालवत होते. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. दोन्ही वाहने वेगात असल्याने, धडकेचा आवाजच एवढा मोठा होता कि, आजूबाजूच्या परिसरातील धावतच अपघात स्थळी आलेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमजद घारे यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची रक्ताने माखलेली अवस्था बघताच अपघाताची भीषणता लक्षात येते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular