27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraराज्यात ४ ऑक्टोबरपासून शैक्षणिक संस्था होणार सुरू - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

राज्यात ४ ऑक्टोबरपासून शैक्षणिक संस्था होणार सुरू – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे क्रमप्राप्त आहे.

राज्य सरकारनं राज्यात अखेर ४ ऑक्टोबरपासून शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर शिक्का मोर्तब केले असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील घोषणा जाहीर केली आहे.  त्यासोबतच शाळांमध्ये मुलं जाताना नेमके कोणते नियम असतील?  हे देखील तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, राज्यात ग्रामीण भागामध्ये ५ वी ते १२ वीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागामध्ये ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत. सर्व शाळा, विद्यार्थी, पालकांना टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली निर्बंधांची नियमावली लागू असणार आहे.

दरम्यान, यावेळी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत शाळांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या काही विशेष नियमांचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये शिक्षकांचे लसीकरण, शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग, शाळेत येताना जाताना घ्यावयाची काळजी,  खेळाबद्दलचे नियम, आजारी विद्यार्थ्यांना शोधायचं कसं, याविषयीचे नियम ठरवण्यात आले असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

प्रथम विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेनं सक्ती न करणं, विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवणं, शक्य असेल तिथे एक दिवसा आड शाळा ठेवणं,  या बाबी देखील नियमावलीत समाविष्ट आहेत,अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जावी, असं देखील नियमावलीत नमूद केल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular