23.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeSindhudurgराजन तेली शिवबंधनात भाजपला सोडचिठ्ठी

राजन तेली शिवबंधनात भाजपला सोडचिठ्ठी

तेली यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत टीकाही केली.

भाजपकडून येथील विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळलेले माजी आमदार तथा भाजपचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख राजन तेली यांनी आज अखेर ‘मातोश्री’वर जात शिवबंधन बांधून घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी दुपारी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ठाकरे शिवसेना तेली यांना येथून महायुतीचे संभाव्य उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताना तेली यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत टीकाही केली.

राणे कुटुंबीयांकडून होणाऱ्या राजकीय खच्चीकरणाला कंटाळून तसेच एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्याच कलाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे ही घराणेशाही आपल्याला पटली नसल्याने भाजप सोडत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा राजन तेली विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. तेली यांनी पक्षप्रमुख ठाकरे, पक्ष सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, प्रशांत गडेकर, अजित राऊळ, मदन राणे आदी उपस्थित होते. तेली यांचा राजकीय संघर्ष गेले कित्येक वर्षे सुरू आहे. या संघर्षाला अंतिम स्वरूप देण्यासाठी तेली यांनी ठाकरे शिवसेनेवर विश्वास ठेवून मशाल हाती घेतली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular