27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeKhedखेड परिसरात हातभट्टीविरोधी कारवाईत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड परिसरात हातभट्टीविरोधी कारवाईत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

तालुक्यात गावठी हातभट्टी दारूविरोधात येथील पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १ किमी जंगलमय व डोंगर भागांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये धाडसत्र राबवून ६ लाख ६० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणाना अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, राजेंद्र मुनगेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ५ जुलै रोजी सकाळी ७ वा. मौजे कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १ किमी च्या जंगलमय व डोंगर भागांमध्ये ओढ्याजवळ असणाऱ्या हातभट्टी दारू धंद्यावर या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात आली.

चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एका ठिकाणी हातभट्टी बेवारस असल्याचे आढळले. या कारवाईमध्ये मंगेश दगडू निकम, सुरेश निकम, संतोष जयराम निकम, अशोक लक्ष्मण निकम (सर्व राहणार खेड) यांच्याकडे व अन्य एका ठिकाणी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या हातभट्टीसाठी लागणारा गूळ, नवसागर, हातभट्टी दारू, असा ६६०८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन भोयर व सहकाऱ्यांनी कारवाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular