26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplun६ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ ना. उदय सामंत यांच्याहस्ते...

६ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ ना. उदय सामंत यांच्याहस्ते…

ना. सामंत यांनी चाफेरी ग्रामपंचायत हद्दीतील विकासकांसाठी तब्बल सहा कोटींचा निधी मंजूर.

तालुक्यातील जयगड येथील चाफेरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकाचवेळी सहा कोटींच्या विकासकामांचे उद्योगमंत्री ना. सामंत यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे, भविष्यात चाफेरीतील ग्रामस्थांना कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे मत ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केले. चाफेरी ग्रामपंचायतीमधील प्रलंबित विकासकामांसंदर्भात येथील उद्योजक नंदू केदारी आणि अमोल बैकर यांनी स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून ना. सामंत यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. ना. सामंत यांनी या मागण्यांची तत्काळ दाखल घेत चाफेरी गावातील विकासकामांना तत्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. ही आश्वासनपूर्ती तत्काळ करताना ना. सामंत यांनी चाफेरी ग्रामपंचायत हद्दीतील विकासकांसाठी तब्बल सहा कोटींचा निधी मंजूर करून घेतला.

सहा कोटी इतक्या मंजूर निधीतून चाफेरी गावातील जलजीवन योजनेतून मंजूर झालेल्या नळपाणी योजनेची पाईपलाइन तत्काळ टाकण्यात येणार आहे. या पाईपलाईनसाठी १ कोटी २७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय चाफेरी गावडेवाडी ते. बौद्ध वाडी रस्त्याकरिता १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा एकूण सहा कोटींच्या विकासकांसाचा शुभारंभ रविवार ९ जुलै रोजी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक नंदू केदारी, पंचायत समितीचे माजी सदस्य विवेक सुर्वे, सरपंच सौ. कांबळे अमोल बैकर, विनोद चौघुले, सुनील पाटील, दिपक पाटील, विजय धनावडे यांच्यासह चाफेरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular