21.9 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeRatnagiriसंगमेश्वरमधील एका वसतिगृहातील अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन

संगमेश्वरमधील एका वसतिगृहातील अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन

एका मुलीने वाचा फोडण्याचे काम केले आणि एका ऑडिओमुळे हा प्रकार समोर आला.

एका वसतिगृहात अल्पवयीन मुलींसोबत गैरप्रकार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित संस्थेच्या तिघांविरुद्ध पोस्को आणि विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मुर्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. याप्रकरणी नवन मुल्ये, प्रथमेश मुळ्ये, संजय मुख्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुक्यातील एका वसतिगृहात अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन होत असल्याची ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली.

तपासासाठी पोलिस रवाना झाले. मात्र, या प्रकाराला एका मुलीने वाचा फोडण्याचे काम केले आणि एका ऑडिओमुळे हा प्रकार समोर आला, असे सांगितले जात आहे. या प्रकारात तीन मुली पीडित असल्याचे सांगण्यात आले. गणोत्सवाच्या सुटीत काही मुले-मुली आपापल्या गावी गेले होते. परंतु या मुली तिथेच राहिल्या होत्या आणि संबंधितांच्या घरी होत्या. तेव्हा या मुलींचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मुलींच्या सांगण्यावरून फिर्यादीने ही तक्रार ऑनलाईन दाखल केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular