26.9 C
Ratnagiri
Wednesday, October 30, 2024
HomeIndiaआधी लसीकरण आपल्या देशाचे मग इतरांचे

आधी लसीकरण आपल्या देशाचे मग इतरांचे

केंद्र सरकार आता ॲस्ट्राझेनेकाची लस इतर देशांना निर्यात करणार नाही आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदी देशांतर्गत होणाऱ्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण प्रमाण बघता, एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आता ॲस्ट्राझेनेकाची लस इतर देशांना निर्यात करणार नाही आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदी देशांतर्गत होणाऱ्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया देशात ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनची निर्मिती कोविशील्ड या नावाने करत असून, दोन दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने कोविशील्ड लसीकरणासंदर्भात नवीन गाइडलाइन जारी केल्याचे माहिती मिळत आहे. त्याद्वारे कोविशील्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्यात आले आहे. कोविशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर कालावधीचे अंतर सध्या ४ ते ६ आठवडे इतके केले आहे. कालावधी वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशील्ड लसीवर लागू होणार असून इतर कोणत्याही लसीवर नाही. देशात अचानक कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत वाढ झाल्याने शासन चिंतेत पडले आहे. त्यामुळे सध्या इतर देशांना पुरवण्यात येणाऱ्या कोरोनाच्या लसीवर काही काळासाठी निर्बंध आणले असून, देशांतर्गत कोरोना लसीची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. आतापर्यंत पाच कोटी लोकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

covid vaccine

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मागील काही काळापासून लक्षणीय वाढ झालेली आढळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील लसीकरणामध्ये वाढ घेऊन लवकरात लवकर लसीकरणाचे ध्येय  पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक समाविष्ट भाग म्हणून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना येत्या एप्रिलपासून कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. १ मार्चपासून फक्त 60 वर्षावरील नागरिक आणि 45 वर्षावरील गंभीर आजार लक्षणे असलेल्या नागरिकांनाचं कोरोनाची लस देण्यात आली होती. आता त्या नियमात शिथिलता आणण्यात आली असून, आतापर्यंत पाच कोटी नागरिकाना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. 16 जानेवारीपासून भारतामध्ये कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, त्यानंतर भारता बाहेरील देशांकडूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने भारताने शेजारील देश, आशियायी, आफ्रिकन देश आणि युरोपच्या काही देशांना कोरोनाची लस ठराविक प्रमाणात निर्यात करण्याचा निर्णय घेतला. परंतु, देशातील अचनक वाढलेले कोरोन रुग्णांचे प्रमाण पाहून, देशांतर्गत मागणी वाढल्याने ही बाहेर केली जाणारी विक्री काही कालावधीसाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या देशामध्ये कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांच्या वर गेली असून, तर तीन लाख 68 हजार लोकांवर उपचार प्रक्रिया सुरु आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ कोटी १७ लाख ८७ हजार पेक्षा आधिक कोरोना केसेस समोर आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये बुधवारी तर अचानक 31 हजार 855 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ झालेली आढळली आहे. हा आकडा नक्कीच काळजीत टाकणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनसुद्धा कोरोन संसर्ग आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात पुन्हा कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याचे समजते आहे. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण सक्रीय रुग्णसंख्या 247299 असून  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% वर आले आहे.

केंद्र सरकारने कोविशील्ड लसीकरणा संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जरी केल्यानंतर आरोग्य विभागाने आता दुसऱ्या डोसच्या लसीकरणाबाबत सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. या सुधारित वेळा पत्रकामध्ये 24 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसीकरण घेणाऱ्यांना दुसरा डोस कधी घ्यायचा ते नमूद केले आहे. केंद्राच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्वी जो 28 ते 42 दिवसांचा होता तो कालावधी वाढवून 42 ते 56 दिवसांचा करण्यात आला आहे. कोविशील्डच्या संदर्भात केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन जारी करण्यापूर्वी लसीकरणाचा मुदत कालावधी 0/28/42 असा ठरवण्यात आला होता. या मध्ये पहिला डोस लागल्यावर 28 दिवसानंतर दुसरा डोस आणि त्याच्या 14 दिवसांनी अँटीबॉडी चाचणी निश्चित केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular