ब्रिटनचे राजघराणे सोडून सामान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलेले दाम्पत्य ड्युक ऑफ ससेक्स युवराज हॅरी यांनी सॅन फ्रान्सिस्कोत एका प्रशिक्षण कंपनीत चीफ इम्पॅक्ट ऑफिसरची नोकरी करायला सुरूवात केली आहे. हॅरी आता ‘बेटरअप’ नावाच्या स्टार्टअप कंपनीमध्ये एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून काम करताना दिसण्यात येतील. २०१३ मध्ये स्थापन झालेली बेटरअप ही एक हेल्थ-टेक कंपनी आहे आणि ती व्यावसायिक आणि मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करते. कंपनीने फक्त त्यांचे जॉब प्रोफाइल सांगितले असून हॅरी यांना अदा करण्यात येणाऱ्या वेतनाबद्दल काहीही माहिती कळू दिली नाही. हॅरी यांचे कंपनीमध्ये मानसिक आरोग्य प्रकल्पावर निगराणी करण्याचे काम पाहतील. त्याच्प्रमाणे आणखी एक सामाजिक भूमिकेतही हॅरी दिसतील. रूपर्ट मर्डोक यांची सून कॅथरीन यांच्या अॅस्पिन इन्स्टिट्यूटमध्ये मानद आयुक्त म्हणून चुकीच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार रोखण्याचे काम ते पाहतील.
सीआयओपदी नियुक्ती झाल्यानंतर हॅरी पहिल्यांदीच व्यक्त झाले, ते म्हणाले कि, मी कंपनीच्या मानसिक आरोग्य प्रकल्पात काम करणार असून आपल्या मानसिक तंदुरुस्तीकडे व्यवस्थित लक्ष दिले तर आपल्याला माहीत नसलेल्या संधीही उपलब्ध होतात असे मला वाटते. शाही नौदल कमांडोनिही असे मत मांडले आहे कि, मनाची स्थिती ही उत्तम असणे, आपणा सर्वांना अत्यावश्यक असते. आणि यालाच सेल्फ-ऑप्टिमायझेशन असे म्हणतात. याचाचं अर्थ असा होतो कि, आपल्यामध्ये असलेल्या सर्वोत्तम क्षमतांचा योग्य रित्या वापर करणे. लोकांसाठी या गोष्टी शक्य व्हाव्यात यासाठी तसे वातावरण तयार करण्यात मी कायम प्रयत्नशील राहीन, आणि यासाठी नक्कीच मी माझे योगदान देणार आहे.
बेटरअप कंपनी अॅप ही अग्रगण्य कंपनी आधारित प्रशिक्षण, सल्लामसलत या क्षेत्रामध्ये अव्वल मानली जाते. हॅरी यांच्या केलेल्या नियुक्तीबाबत कंपनीचे सीईओ अॅलेक्सी रॉबिचॉक्स यांनी सांगितले की, बेटरअप विश्वाचा एक सदस्य म्हणून हॅरी जगभरात मानवी क्षमता वाढवण्यावर भर देणार आहेत. आम्ही कंपनीच्या सर्व मंचांवर त्यांचा अनुभव शेअर करणार आहोत. हॅरी यांनी याआधीही नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय यांसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट आणि इतर कार्यक्रम सादर केले आहेत.
बेटरअप ही एक हेल्थ टेक कंपनी असून तिचा टर्न ओवर साधारण १२,५५६ कोटी रुपयां दरम्यान आहे. कंपनीमध्ये २७० कर्मचाऱ्यांसह दोन हजार प्रशिक्षक कार्यरत असून, ते मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा, मार्स, वार्नर मीडिया, शेव्हरॉन यांसारख्या प्रसिद्ध मोठ्या कंपन्या बेटरअप कडून सेवा घेतात. सीईओ सांगतात की, गेल्या एक वर्षात कर्मचाऱ्यांच्या विकासाबाबतीतच्या प्रशिक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. त्यामध्ये आमच्या कंपनीला सुमारे ९०० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
कोचिंग स्टार्ट अप बेटरअप या कंपनीत प्रिन्स हॅरी यांना चीफ इम्पॅक्ट ऑफिसर पद देण्यात आले आहे. ही कंपनी सॅन फ्रान्सिस्कोची हेल्थ टेक कंपनी आहे. ही कंपनी व्यावसायिक पातळीवर मानसिक स्वास्थ क्षेत्रात कोचिंग देते. प्रिन्स हॅरीने त्याच्या ब्लॉगवर बेटरअप टीमशी जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करून संधी दिल्याबद्दल कंपनीचे आभार मानले आहेत. त्याच्या मते प्रथम मानसिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित केल्यावर माणूस नवीन संधी आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या शक्तीचा अनुभव घेतो. प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराण्याच्या सर्व उपाध्यांचा त्याग करून सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच अभूतपूर्व आहे. राजघराणे त्यागल्यावर त्यांच्या आयुष्यात खुपच बदल घडून आला असून राजघराण्यातील मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत.