26.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSportsटीम इंडियाचा पाकिस्तानवर ५ गडी राखून शानदार विजय

टीम इंडियाचा पाकिस्तानवर ५ गडी राखून शानदार विजय

२०२१ रोजी भारतीय संघ विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. रविवारी रात्री भारताने त्या पराभवाचा हिशेब साफ केला आहे.

सुमारे १० महिन्यांपूर्वी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय संघ विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. रविवारी रात्री भारताने त्या पराभवाचा हिशेब साफ केला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर ५ गडी राखून शानदार विजय नोंदवला. यापूर्वी २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवरचा हा ९ वा विजय होता.

१९ वर्षीय युवा गोलंदाज नसीम शाहने पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू ताशी १४२ किलोमीटर वेगाने टाकला. बॉलने राहुलच्या बॅटची आतील कड घेतली आणि तो बोल्ड झाला. पाकिस्तान १४७ धावांवर ऑल आऊट झाल्याच्या जल्लोषात मग्न झालेल्या भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. १० महिन्यांपूर्वी झालेल्या संघर्षात टॉप ३ भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो आठवून प्रत्येकजण थक्क झाला होता. मधल्या फळीने नंतर जबाबदारी घेतली, पण राहुलने आपल्या बेजबाबदार वृत्तीने संघाला अडचणीत आणले.

केएल राहुलची गणना टीम इंडियाच्या प्रतिभावान खेळाडूंमध्ये केली जाते, परंतु मोठ्या सामन्यांमध्ये या खेळाडूची बॅट काही विशेष करू शकत नाही. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानसमोर ८ चेंडूत ३ धावा करणाऱ्या राहुलकडून टीम इंडियाला आशिया चषकात थोडी चांगली अपेक्षा होती. मात्र या सामन्यातही त्याने आशा धुळीस मिळवल्या.

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भावना उफाळून येतात. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. या महान सामन्यात जो चांगली कामगिरी करतो तो रातोरात स्टार बनतो. टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये दहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला असतानाही, विराट बाबर आणि रिजवानला मिठी मारण्यासाठी चर्चेत होता. काही चाहत्यांना कोहलीची ही शैली खेळाच्या भावनेशी सुसंगत वाटली, तर काही चाहते विराटवर चिडले. आता असेच मैत्रीचे दृश्य आशिया कपमध्ये पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular