25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSportsभारताने टी-२० मालिका जिंकली

भारताने टी-२० मालिका जिंकली

टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक ४-४ विकेट घेतल्या.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नेपियर येथे खेळला जाणारा तिसरा टी-२० पावसामुळे अनिर्णित राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किवी संघ १९.४ षटकात सर्वबाद १६० धावांवर आटोपला. डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. त्याचवेळी ग्लेन फिलिप्सने ५४ धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक ४-४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या शेवटच्या ७ विकेट १४ धावांवर पडल्या.

प्रत्युत्तरात टीम इंडियाने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला. यानंतर एकही चेंडू खेळता आला नाही आणि तिसरा टी-२० सामना टाय घोषित करण्यात आला. यासह टीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली. सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हर होते, पण एकही चेंडू टाकायला वाअर्शदीप सिंगने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्याने दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फिन अॅलनला एलबीडब्ल्यू आऊट केले. एलनने ४ चेंडूंचा सामना केला आणि ३ धावा करून बाद झाला.

किवी संघाची दुसरी विकेट मोहम्मद सिराजने घेतली. त्याने १२ चेंडूत १२ धावा करून मार्क चॅपमनला अर्शदीप सिंगकडे झेलबाद केले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने शानदार खेळी केली. त्याने ३३ चेंडूंचा सामना केला आणि १६३ च्या स्ट्राईक रेटने ५४ धावा केल्या. त्याची विकेट मोहम्मद सिराजने घेतली.व नव्हता. अशा स्थितीत सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षल पटेलला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर केन विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमन न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आहे. भारत प्लेईंग इलेव्हन टीम पुढीलप्रमाणे, इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

न्यूझीलंड टीम – फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.

RELATED ARTICLES

Most Popular