25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeIndiaदेशातील २१ विमानतळांना ग्रीनफिल्ड विमानतळाचा दर्जा, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

देशातील २१ विमानतळांना ग्रीनफिल्ड विमानतळाचा दर्जा, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील २१ विमानतळांना ग्रीनफिल्ड विमानतळाचा दर्जा देण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डी विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. या २१ विमानतळांपैकी काहींची उभारणी सुरू आहे, तर काही प्रवासी सेवेसाठी आधीपासूनच खुली केली गेली आहेत.

महाराष्ट्रातील तीन विमानतळांसह कर्नाटकातील विजापूर, हसन, कलबुर्गी आणि शिमोगा, गोव्यातील मोपा, मध्यप्रदेशातील डबरा, उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि जेवार, गुजरातमधील ढोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्रप्रदेशातील दगदार्थी, भोगापुरम आणि ओरवाकल, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग,  केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलोंगी आदी विमानतळांचा या यादीमध्ये समावेश केला गेला आहे.

यापैकी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळ, महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिंधुदुर्ग विमानतळ, केरळमधील कन्नूर विमानतळ, सिक्कीममधील पाकयोंग विमानतळ, कर्नाटकातील कलबुर्गी विमानतळ, आंध्र प्रदेशमधील ओरवाकल विमानतळ आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर असे ८ ग्रीनफिल्ड विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई दळणवळणाला चालना देण्यासाठी आणि परवडणारी हवाई वाहतूक जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रादेशिक हवाई दळणवळण योजना  – UDAN – उडे देश का आम नागरिक सुरू केली. या योजनेंतर्गत विमानतळांचा विकास आणि विस्तार करण्याच्या मागणीवर आधारित  असून विविध सवलती पुरवण्यासाठी राज्य सरकार तसेच विमानकंपनी चालकांच्या प्रतिबद्धतेवर अवलंबून आहे.

उडानअंतर्गत बोलींच्या चार फेऱ्यांच्या आधारे, उत्तर प्रदेशसह देशभरात विविध ठिकाणी १४ जल विमानतळ आणि ३६ हेलिपॅडसह १५४ विमानतळ निश्चित करण्यात आले आहेत. १४ मार्च २०२२ अखेर पर्यंत,  ८ हेलीपॅडस आणि २ जल विमानतळांसह ६६ सेवेत नसलेल्या आणि सेवेत कमी असलेले विमानतळ कार्यान्वित केले गेलेले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular