26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeKhedउपमुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय विभागातील विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला

उपमुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय विभागातील विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला

शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत,अशी अपेक्षा व्यक्त मी करतो आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित दादा पवार यांनी सांगितले कि, खेड येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडून येणे शक्य आहे, त्याप्रमाणेच शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत,अशी अपेक्षा व्यक्त मी करतो आहे.

रत्नागिरी जिल्हयाच्या विविध प्रश्नासंदर्भात बिसू हॉटेल,खेड येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. सर्व प्रथम रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी रत्नागिरी जिल्हयात होणारी विविध विकास कामे व राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सादरीकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी विविध शासकीय विभागातील विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रशासकीय कामांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारणा करुन येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्याचे आश्वासनही दिले.

या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक योजना, डोंगरी विकास, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कोविड १९ बाबत केलेल्या उपाययोजना, सिंधूरत्न समृध्द योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,  कृषी विभाग, मत्‍स्य विभाग,  रोजगार हमी योजना,  प्रादेशिक पर्यटन विकास,  नगरपालिका प्रशासन, माझी वसुंधरा, वन विभागांतर्गत संरक्षित केले जाणारे कांदळवन पार्क,  प्राणीसंग्रहालय उभारणी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी योजना,पणन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला.

यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, उपविभागीय वनाधिकारी श्री.खाडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular