24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeSportsभारताची झिम्बाब्वेविरुद्ध आज तिसरी लढत

भारताची झिम्बाब्वेविरुद्ध आज तिसरी लढत

दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

भारतीय टी-२० विश्वविजेत्या संघातील यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन व शिवम दुबे हे शिलेदार झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात दाखल झाले आहेत. यामुळे दुसऱ्या लढतीत विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघात बदल होणार हे निश्चित आहे. यशस्वी जयस्वालचा संघातील समावेश पक्का आहे; पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करील, याबाबत अनिश्चितता आहे. यशस्वी, संजू व शिवमच्या समावेशामुळे भारताविरुद्धच्या उद्या होत असलेल्या तिसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा कस लागेल हे निश्चित आहे. याप्रसंगी दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

RELATED ARTICLES

Most Popular