28.9 C
Ratnagiri
Tuesday, June 17, 2025

जिल्ह्यात पाच महिन्यांत १२ बेवारस मृतदेह

नदी, समुद्रकिनारी, खाजणात, जंगलात किवा अगदी निर्जनस्थळी...

अंतिम प्रभाग रचना एक सप्टेंबरला होणार जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत....

खेडच्या नाट्यगृहाचा पडदा दोन दशकांनी उघडणार

शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल...
HomeMaharashtraकशाला चालवताय अधिवेशन? गुहागरचे आ. भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांवर संतापले

कशाला चालवताय अधिवेशन? गुहागरचे आ. भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांवर संतापले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.

सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. दोन उपमुख्यमंत्री आहेत. ते दोघेही नाहीत. संबंधित खात्याचे मंत्रीही नाहीत, संबंधित विभागाचे सचिवही नाहीत.. सभागृहात काय चाललय? कशाला चालवताय सभागृह? (अधिवशेन) अधिकाऱ्यांना चेंबरमध्ये बसून लोकांचं दुःख कळत का?’ अशा आक्रमक भाषेत गुहागरचे आमदार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव मंगळवारी सभागृहात कडाडले. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

भास्कर जाधव काय म्हणाले? – २०१४ साली सत्तेत आल्यानंतर सरकारने या सभागृहाची आणखी एक प्रथा ‘बिघडवली आहे. ज्यावेळी महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा असायची त्यावेळी या सभागृहाच्या लॉबीमध्ये संबंधित विभागाचे सचिव बसलेले असायचे. हे मी स्वतःपाहिलेलं आहे. १९९५ सालापासून मी सभागृहामध्ये आहे. पण २०१४ पासून ही प्रथा बिघडवली. एकही सचिव या ठिकाणी बसत नाही. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सभागृहात चर्चा असायची त्यावेळी स्वतः डीजी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बसायचे.

आता मंत्री सांगतात की संबंधित विभागाचे अधिकारी चेंबरमध्ये बसून चर्चा ऐकतात. या सरकारने अधिकाऱ्यांचे लाड करून ठेवले आहेत. त्यामुळे राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम २०१४ पासून सुरु झालं आहे. मात्र, हे सर्व चुकीचं आहे, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular