भारतीय टी-२० विश्वविजेत्या संघातील यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन व शिवम दुबे हे शिलेदार झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात दाखल झाले आहेत. यामुळे दुसऱ्या लढतीत विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघात बदल होणार हे निश्चित आहे. यशस्वी जयस्वालचा संघातील समावेश पक्का आहे; पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करील, याबाबत अनिश्चितता आहे. यशस्वी, संजू व शिवमच्या समावेशामुळे भारताविरुद्धच्या उद्या होत असलेल्या तिसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा कस लागेल हे निश्चित आहे. याप्रसंगी दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.