25.4 C
Ratnagiri
Tuesday, February 17, 2026

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...

चिपळुणात कुणाचा सभापती होणार? किंगमेकर शेखर निकमांच्या निर्णयाकडे लक्ष

चिपळुणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने पंचायत...

एमआयडीसीतील मत्स्य उत्पादक कंपनीला दिड कोटींची गंडा

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील 'मे. जिलानी मरीन...
HomeRatnagiriकोर्टाच्या निकालानंतरच आपण एकत्रित मिळून निर्णय घेऊ – उद्योगमंत्री सामंत

कोर्टाच्या निकालानंतरच आपण एकत्रित मिळून निर्णय घेऊ – उद्योगमंत्री सामंत

वेदांताचे मालक असणारे अनिल अगरवाल यांनीच स्टरलाईट प्रकल्प रत्नागिरीत आणला.

रत्नागिरीमधील झाडगाव एमआयडीसीतील स्टरलाईट प्रकल्पाची सगळी जमीन मूळ मालकांनी परत मागितलेली नाही. ती जमीन अजूनही एमआयडीसीच्या मालकीची आहे. २८ नोव्हेंबरला न्यायालयात निकाल होणार आहे. त्यानंतर याबाबत आपण निर्णय घेऊ, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ऑनलाइन झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले कि, स्टरलाईट जमीनमालकांचा सगळी जमीन आम्हाला मिळाली पाहिजे, असा कुठलाही दावा नाही. स्टरलाईट कंपनीचा प्रकल्प हा माझ्या मतदार संघातील आहे. याबाबत बाबू पडवेकर, सावंत, राजेंद्र अहिरे या सर्वानी माझी भेट घेतलेली आहे. मी त्यांना सांगितले, २८ तारखेचा निकाल होऊ दे. या निकालानंतर भविष्यात तेथे काय करायचं हे आपण सगळ्यांनी बसून ठरवू, अशा प्रकारची मी विनंती केली होती. त्याला त्यांनी मान देऊन मान्य केले आहे.

ती जमीन मूळ मालकाला मिळू शकते की नाही ते एमआयडीसी ठरवणार. वेदांताचे मालक असणारे अनिल अगरवाल यांनीच स्टरलाईट प्रकल्प रत्नागिरीत आणला. त्याला विरोध झाल्याने प्रकल्प तामिळनाडूत नेला गेला. त्या दिवसापासून त्या जागेवर काहीच झालेले नाही. ती जागा त्यांच्याकडेच पडून आहे. जिल्हा न्यायालयामध्ये ती जागा शासनाने परत घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत. त्याच्या विरोधामध्ये अगरवाल हायकोर्टात गेलेले आहेत. यावर २८ तारखेला काय तो निर्णय होणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. त्यामुळे कोर्टाच्या निकालानंतरच आपण एकत्रित मिळून त्यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular