HomeRatnagiriरत्नागिरीत इन्फिगो आयकेअरमध्ये अत्याधुनिक रेटीना उपचार; शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया सुविधा

रत्नागिरीत इन्फिगो आयकेअरमध्ये अत्याधुनिक रेटीना उपचार; शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया सुविधा

३ दिवसांत २०० रुग्णांची तपासणी आणि १५ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी; डॉ. प्रसाद कामत यांची विशेष सेवा

रत्नागिरी: डोळ्यांचा पडदा (रेटीना) हा दृष्टीचा सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा भाग मानला जातो. यातील आजारांवर वेळेत उपचार न मिळाल्यास दृष्टी जाण्याचा मोठा धोका असतो. कोकणातील रुग्णांना यासाठी वारंवार मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने ‘इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल’ने (Infigo Eye Care Hospital) रत्नागिरीत अत्याधुनिक रेटीना उपचार सेवा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय विशेष शिबिरात तब्बल २०० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, अत्यंत गुंतागुंतीच्या १५ रेटीना शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

तज्ज्ञ डॉक्टरांची नियमित ओपीडी

इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या रत्नागिरी शाखेत दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नामवंत रेटीना तज्ज्ञांची विशेष ओपीडी व शस्त्रक्रिया सत्र आयोजित केले जाते. या सत्रादरम्यान प्रसिद्ध रेटीना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांनी रुग्णांची तपासणी केली. तीन दिवसांच्या कालावधीत डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केल्या.

वर्षभरात ५०० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया

मधुमेहामुळे होणारा ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ (Diabetic Retinopathy) आजार, ‘रेटिनल डिटॅचमेंट’ (Retinal Detachment – पडदा सरकणे) आणि वयोमानानुसार होणारे पडद्याचे विकार यांसारख्या गंभीर समस्यांवर तातडीने आणि अचूक उपचार मिळणे गरजेचे असते. इन्फिगो आयकेअरने गेल्या वर्षभरात ५०० हून अधिक गुंतागुंतीच्या रेटीना शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून रुग्णांना पुन्हा नवी दृष्टी मिळवून दिली आहे.

शासकीय योजनांतर्गत मोफत उपचारांची सुविधा

आर्थिक परिस्थितीअभावी एकाही रुग्णाची दृष्टी हिरावली जाऊ नये, यासाठी इन्फिगो आयकेअर कटिबद्ध आहे. हे रुग्णालय ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (PMJAY) अंतर्गत समाविष्ट (Empanelled) आहे. त्यामुळे पात्र आणि गरजू रुग्णांना डोळ्यांच्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध होत आहेत.

“डोळ्यांच्या पडद्याचे विकार जितक्या लवकर लक्षात येतील, तितके उपचारांचे यश अधिक असते. स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. नागरिकांनी डोळ्यांमधील बदलांकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.”

इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल प्रशासन

RELATED ARTICLES

Most Popular