HomeDapoliदापोली: केळशीत जुन्या वादातून तरुणासह कुटुंबावर जीवघेणा हल्ला; ८ जणांवर गुन्हा दाखल

दापोली: केळशीत जुन्या वादातून तरुणासह कुटुंबावर जीवघेणा हल्ला; ८ जणांवर गुन्हा दाखल

मध्यस्थी करणाऱ्या आई व मित्रांनाही बेदम मारहाण; दापोली पोलिसात गुन्हा नोंद

दापोली (रत्नागिरी): दापोली तालुक्यातील केळशी येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्र आणि महिलांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या गंभीर प्रकारानंतर दापोली पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदिवसा शाळेजवळ घडला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:४० वाजण्याच्या सुमारास केळशी मोहल्ल्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ ही घटना घडली. फिर्यादी रिजवान दाऊद अलबा (वय ३२, रा. केळशी नबी मोहल्ला) आणि संशयित आरोपी रियाज अली बोरकर यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाची खुन्नस मनात धरून आरोपींनी कट रचला आणि बेकायदेशीर जमाव जमवून रिजवान यांना गाठले.

“आज तुला संपवून टाकतो”; डोळ्यावर ठोसे मारून जीवे मारण्याची धमकी

आरोपींनी रिजवान यांना घेरून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी मुख्य आरोपी रियाज बोरकर याने रिजवान यांच्या डाव्या डोळ्यावर जोरदार बुक्क्या मारून त्यांना गंभीर दुखापत केली. त्यानंतर इतर साथीदारांनी मिळून त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवले. मारहाण सुरू असतानाच “आज तुला संपवूनच टाकतो,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मध्यस्थी करणाऱ्या आई आणि मित्रांनाही बेदम मारहाण

रिजवान यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांचे मित्र अबरार इस्माईल डायली, रियान इक्बाल चाऊस, नाजीम इक्बाल डायली, त्यांची आई हमीदा दाऊद अलबा आणि मेहुणे मसूद शरीफ बोरकर हे धावून आले. त्यांनी आरोपींना थांबवण्याचा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त आरोपींनी मध्यस्थी करणाऱ्यांनाही सोडले नाही. त्यांनी महिलांसह सर्वांवर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादीचे मेहुणे मसूद बोरकर यांच्या उजव्या गालावर मार लागून ते जखमी झाले.

८ संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल

घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर रिजवान दाऊद अलबा यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २:३९ वाजता एकूण ८ जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे.

  • गुन्हा नोंद व कलमे: गुन्हा रजि. नं. १७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९०, ११५(२), ३५१(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३)/१३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • आरोपींची नावे: रियाज अली बोरकर, कबीर इलियास चाऊस, अली इलियास चाऊस, समीउल्ला फराज चाऊस, इलियास अली चाऊस, फईम इलियास चाऊस, जमशीद इलियास चाऊस आणि वहीद आशिफ खमसे (सर्व रा. केळशी नबी मोहल्ला, ता. दापोली).

दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular