25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriमहावितरणकडून अपघातांची पाहणी, वर्षात ११ जणांचा 'शॉक'ने मृत्यू

महावितरणकडून अपघातांची पाहणी, वर्षात ११ जणांचा ‘शॉक’ने मृत्यू

काळात वीजवितरण व्यवस्थेदरम्यान झालेल्या अपघातामुळे २६ जनावरांनी जीव गमावला असून, ३१ जनावरे गंभीर बाधित झाली आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विद्युत अपघातामध्ये ११ जणांचा बळी गेला तर ११ जण गंभीर झाले आहेत. अशा अपघातात २६ प्राण्यांचा जीव गेला असून, ३५ प्राणी जखमी झाले आहेत. विद्युत अपघातासंदर्भात तांत्रिक अहवाल देण्यासाठी शासनाच्या कार्यरत असलेल्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून ही माहिती मिळाली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग विद्युत निरीक्षक कार्यालयामार्फत महावितरणच्या अपघातांबाबत पाहणी केली जाते. एखादी दुर्घटना घडली की, महावितरणकडून या कार्यालयाला तत्काळ माहिती दिली जाते. त्यानंतर या कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन अपघात नेमका कशामुळे झाला, याचा सविस्तर तांत्रिक अहवाल विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून दिला जातो.

त्या अहवालावरच पुढील कार्यवाही होते. या कार्यालयाने विद्युत अपघातांची वर्षभराच्या आकडेवारी जाहीर केली. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत वीज वितरण व्यवस्थेमध्ये विद्युतवाहिन्या तुटणे, शॉक लागणे, उपकेंद्र, विद्युतखांब आणि ट्रान्सफॉर्मर आदी ठिकाणी अपघात होऊन सहाजणांनी आपला जीव गमावल्याची नोंद झाली आहे तर सहाजण गंभीर जखमी आहेत. या अपघातांमध्ये १० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. याच काळात वीजवितरण व्यवस्थेदरम्यान झालेल्या अपघातामुळे २६ जनावरांनी जीव गमावला असून, ३१ जनावरे गंभीर बाधित झाली आहेत. खासगी कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, २ जण जखमी झाले आहेत. प्रायव्हेट पर्सन होम (ए. जी. कनेक्शन) दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, ३ जण जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular