25.9 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriलांजात आठ जनावरांना लम्पीची लागण...

लांजात आठ जनावरांना लम्पीची लागण…

७ पशुसंवर्धन दवाखान्यातील पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण १२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

तालुक्यात लम्पी या त्वचा आजाराने डोके वर काढले असून ८ जनावरांना त्याची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत रिक्त असलेल्या पदांमुळे लांजा तालुका पशुसंवर्धन विभागाची तारेवरची कसरत होत आहे. गतवर्षी ४५ गुरे या साथीत दगावली होती. पुन्हा या आजाराची लागण झाल्याने तालुका पशुसंवर्धन विभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. लांजा तालुक्यात खानवली, खावडी, वाकेड, रिंगणे, वेरवली, वेरळ, पुनस या ७ पशुसंवर्धन दवाखान्यातील पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण १२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

पशुधनची वाढती संख्या, रोगराई, लसीकरण उपचार यासाठी केवळ दोन पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, तालुका पशुधन विकास अधिकारी एवढी पदे भरली आहेत. चार कंत्राटी कर्मचारी श्री आहेत. साटवली, शिपोशी, भांबेड, फिरता दवाखाना लांजा ही पदे भरली आहेत. अन्य ७ दवाखान्यांतील पदे रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पुरती दमछाक होत आहे. शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी आमदार राजन साळवी यांच्याकडे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली असून आमदार साळवी यांनी राज्यशासनाकडे मागणीचे पत्र दिले आहे. तालुक्यात दिवसेंदिवस पशुधन संख्या वाढत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular