21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरांगोळीतून उमटले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

रांगोळीतून उमटले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, असे गौरवोद्वार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले. स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वा. वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांसह रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर विचार जागरण सप्ताह २१ मे ते २८ मे या कालावधीत आयोजित केला आहे. यात दुसऱ्या दिवशी आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वा. सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग स्पर्धकांनी रांगोळीतून साकारले. शहरातील पतितपावन मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते.

स्पर्धकांनी वीर सावरकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग रांगोळीतून साकारताना सावरकर चारित्र्याची ओळख, अभ्यास याची चुणूक दाखवली. सकाळी १० ते ५ या वेळेत ही स्पर्धा आयोजित केली. तर संध्याकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबूलकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी, राजन फाळके, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, पतित पावन संस्थेचे मंदार खेडेकर, परीक्षक कला शिक्षक, चित्रकर नीलेश पावसकर, प्रसिद्ध रांगोळीकर राजू भातडे, रांगोळीकार प्रशांत राजीवले, कलाकार श्रीकांत ढालकर, समन्वयक रवींद्र भोवड, रांगोळी स्पर्धा संयोजक अनघा निकम-मगदूम, सहसंयोजक मंगेश मोभारकर, तनया शिवलकर, केशव भट आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून २८ मे रोजी वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित कार्यक्रमात याचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. पतितपावन मंदिरात रंगावली प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular