27 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeCareerभारतीय गुप्तचर विभागात पदभरती

भारतीय गुप्तचर विभागात पदभरती

भारतीय गुप्तचर विभागात असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदाच्या १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

भारतीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय गुप्तचर विभागात असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदाच्या १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ७ मे २०२२ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

आयबीकडून रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) च्या १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत.

पदासाठी शैक्षणिक पात्रता

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/बीएससी किंवा एमटेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. या परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासोबतच गेट २०२०, गेट २०२१ किंवा गेट २०२२ च्या संबंधित ब्रांचमधील वॅलिड स्कोर असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

अर्ज प्रक्रिया

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर मागसवर्गीय उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ७ मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

RELATED ARTICLES

Most Popular