22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजलजीवन मिशनची चौकशी विशेष पथकाद्वारे

जलजीवन मिशनची चौकशी विशेष पथकाद्वारे

पत नसलेल्या एकेका ठेकेदाराने शंभर शंभर कोटींची कामे घेऊन ठेवली आहेत.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाणी योजनांची कामे हा केवळ दिखावा आहे. २५ टक्केसुद्धा कामे झालेलो नाहीत. ही बाब उघड झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ विशेष पथक पाठवून गुहागरसह जिल्ह्यातील सर्व कामांची तपासणी, सखोल चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले. ही बाब आमदार भास्कर जाधव यांनी समोर आणली. त्यात तथ्य असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित सैनी यांनी मान्य केले. जलजीवन मिशन योजनेतील कामांचा उडालेला बोजवारा आणि जिल्ह्याचा टंचाई आराखडा वेळेत तयार न झाल्याबाबत विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली.

ही बैठक जलजीवनच्या कामांवरून गाजली. पत नसलेल्या एकेका ठेकेदाराने शंभर शंभर कोटींची कामे घेऊन ठेवली आहेत. ते कामे करत नाहीत. झालेल्या कामांनाही दर्जा नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार आणि कार्यकारी अभियंता मयूरी पाटील या दोघांचा जिल्ह्यात संपर्क नाही. ते कुठल्याही कामाच्या ठिकाणी जात नाहीत, दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी बैठकीत केला.या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापासून संबंधितांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कारवाई झाली नाही. जाधव यांच्या एकाही प्रश्नावर श्रीमती पाटील यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. किंबहुना त्या वेगळेच उत्तर देत असल्याचे पाहून डॉ. अमित सैनी यांनी ‘खोटी माहिती बैठकीत देऊ नका’ अशा शब्दांत त्यांना सुनावले.

जि.प.ने स्वतःकडे ठेवल्या योजना राज्यात रत्नागिरी हा एकमेव असा जिल्हा आहे की, पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) नेमलेली असताना बहुतांशी योजना जिल्हा परिषदेने स्वतःकडे घेऊन ठेवल्या आहेत. योजनांची कामे होण्यासाठी लागतील तेवढे इंजिनिअर, कर्मचारी घ्या, असे सांगूनही जिल्हा परिषदेने घेतलेले नाहीत त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले. या विषयी नाराजी व्यक्त करत मंत्री पाटील यांनी ठेकेदारांना काढून टाकण्याचे आदेश दिले. कामांच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता, ठाणे यांचे विशेष पथक तत्काळ गुहागरसह जिल्ह्यात पाठवण्याचेही आदेश त्यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular