26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeSportsदसर्‍याला आयपीएलचा अंतिम सामना ?

दसर्‍याला आयपीएलचा अंतिम सामना ?

या वर्षाची आयपीएल म्हणजे वादाचा विषय ठरलेली स्पर्धा होती. यातले अर्धे सामने आतापर्यंत झालेले आहेत आणि आयपीएलच्या सामन्यांमध्ये काही खेळाडूंना कोरोंनाची लागण झाल्यामुळे आयपीएल 2021 ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेमधील 31 सामने अजूनही बाकी आहेत.

ही स्पर्धा पूर्ण व्हावी अशी आयोजकांची इच्छा होती व त्यावर उपाय म्हणून ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये करण्याची बीसीसीआयने ठरवले. त्यातला दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला अर्थात दसऱ्याच्या दिवशी खेळवला जावा अशी आयोजकांची इच्छा आहे.

हा दुसरा टप्पा दुबईमध्ये खेळवण्यात येणार असल्यामुळे दसऱ्याचं महत्त्व एवढं सामन्याला का देण्यात आलं याबाबत सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. याचे उत्तर दसरा हे नसून, 15 ऑक्टोबर हा दिवस आहे, कारण या दिवशी शुक्रवार आहे. शुक्रवारी बर्‍याच देशांमध्ये विकेंड असतो. दुबईमधील जनतेलाही शुक्रवारी सुट्टी असते. अर्थात शुक्रवारी जर सामना झाला तर जास्तीत जास्त प्रेक्षक तो सामना पाहण्यासाठी येतील असे आयोजकांचे मत आहे आणि त्यासाठीच यूएईच्या क्रिकेट समिती बरोबर बीसीसीआयची चर्चा चालू आहे.

ipl2021trophy

आयपीएल चे यावर्षीचे दुसरे पर्व यशस्वी व्हावे यासाठी हा संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळाकडून जेवढे होईल तेवढे सहकार्य मिळत आहे असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले. त्यामुळे आता दसर्‍याच्या दिवशी आयपीएलच्या ह्या पर्वाचा विजेता कोण होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आयपीएल 2021 चे दुसऱ्या टप्प्यातील सामने आधीच्याप्रमाणे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वरूनच प्रक्षेपित करण्यात येतील तसेच डिस्ने हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर देखील पाहता येतील.

RELATED ARTICLES

Most Popular