हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील हातीस पीर बाबरशेख देवस्थानंकडे जाणे आता अधिक सोपे होणार आहे. काजळी नदीमुळे अनेकवेळा वळसा घालून जावे लागत होते. परंतु आता सोमेश्वर-तोणदे दरम्याना कीरबाग येथे काजळी नदीवर सुमारे ६ कोटीचा निधीतून ८० मीटर लांबिचा एक खांबी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठीही दीड कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे हातीसला जाण्याचे अंतर आता ८ किमीने कमी होणार आहे. या पूलाचे कामचे काम अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख हे ठिकाण प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे.
पर्यटन नकाशावरती त्याची नोंद झालेली आहे. पण याठिकाणी भाविक, पर्यटकांनासाठी जायचे म्हटले तर रत्नागिरीतून काजरघाटीमार्गे टेंबेपूलहून सुमारे ७ ते ८ कि.मी.चे अंतर तोटून जावे लागते. तर सोमेश्वरमार्गे तोणदे गावातून जायचे म्हटले तर काजळी नदीतून होडीतून भाविक, पर्यटकांना प्रवास केल्याशिवाय पर्याय नसतो. पण हा नदीतील होडीतून होणारा प्रवास सुखकर असला तरी पावसाळयात त्यावर बंधने येतात. हातीसहून हरचिरी, चांदेराई, टेंबेपूल, तोणदे, सोमेश्वर या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहनांद्वारे मोठा वळसा घालूना, प्रवास करावा लागतो. मात्र या प्रवासासाठी मारावा लागणारा ८ किमीचा वळस आता कमी होणार आहे.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वीची ही मागणी पूर्ण केली आहे. हे अंतर कमी होण्यासाठी सोमेश्वरकडून तोणदेम ार्गे हातीस जात असताना कीरबाग येथे काजळी नदीवर पूलाची उभारणी केली जात आहे. त्यासाठी सुमारे ६ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. पूलाला जोडरस्त्यासाठी सुमारे दिड कोटीचा निधी असा एकुम साडे सात कोटी ना. उदय सामंत यांनी निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रम ांक ४ अंतर्गंत हे काम मार्गी लावण्यात येत आहे. हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गातील त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी या पुलाचे काम करत आहे.
उरूसा दिवशीची वाहतुक कोंडी सुटणार – हातीस येथे फेब्रुवारी महिन्यात पीर बाबरशेख दर्गास्थळी उर्साचा मोठा कार्यक्रम होतो. दोन दिवसाच्या या यात्रेदरम्यान जिल्हा आणि राज्यभरातील भाविक आणि पर्यटकींची मोठी गर्दी होते. त्यामुळे या स्थळाकडे जाणाऱ्या म ार्गावर दरवर्षी मोठी वाहतूकी कोंडी होत असते. पण आता या नव्याने उभारल्या जाणाऱ्या कीरबाग येथील पुलामुळे या वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची अडचण दूर होणार आहे.