27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriजयगडजवळ समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकेला जलसमाधी

जयगडजवळ समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकेला जलसमाधी

मासेमारी करून परतत असताना सलग तीन अजस्र लाटांचा तडाखा या बोटीला बसला.

मासेमारी करणारी मिनी पर्ससिन नौकेला अजस्र लाटांच्या तडाख्याने जलसमधी मिळाली. जयगड किनाऱ्यावरून सुमारे ९ वावामध्ये ही घटना घडली. सुदैवाने त्या बोटीवरील १० खलाशांना बाजूलाच मासेमारी करणाऱ्या अन्य मच्छीमारांनी वाचवले. मत्स्य विभाग उशिरापर्यंत या घटनेची माहिती घेत होता. लहरी वातवारणांचा मासेमारी हंगामावर चांगलाच परिणाम झाला आहे. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी होत होती. परंतु पुन्हा पावसाळी वातावरण आहे. वादळी वारा आणि समुद्राला उधाण आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार मासेमारीसाठी जात आहेत.

जयगड येथील मच्छीमार मिनी पर्ससिन घेऊन जयगड समुद्रात ९ वावात मासेमारी करीत होते. मासेमारी करून परतत असताना सलग तीन अजस्र लाटांचा तडाखा या बोटीला बसला. बोटीत पाणी भरल्याने हळुहळू बोट बुडू लागली. बोटीत १० खलाशी होते, बोट पाण्यात उलटी झाल्यानंतर अनेक खलाशी तरंगणाऱ्या बोटीच्या तळावर उभे होते. जवळच मासेमारी करणाऱ्या अन्य बोट मालकांनी एक एक करत खलाशांना बोटीत घेतले आणि जीवदान दिले. सर्व खलाशी सुखरूप असले तरी या मच्छीमारी बोटीला जलसमाधी मिळाली.

साई गणेश असे बुडालेल्या मासेम री नौकेचे नाव आहे. जयगड येथील संतोष हळदणकर यांच्या मालकीची ही मासेमारी नौका असल्याची माहिती फिशरिज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जयगड दीपगृह येथे ही दुर्घटना घडली, मत्स्य विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular