27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeKhedरत्नागिरीतील तरुणाचा मृत्यू महाडमध्ये ट्रकला अपघात

रत्नागिरीतील तरुणाचा मृत्यू महाडमध्ये ट्रकला अपघात

मौजे गांधारपाले येथे अचानक समोरून मुंबईकडून गोवा दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली.

महाड शहराजवळील गांधारपाले गावच्या हद्दीत भरधाव ट्रकने टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पोचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री १.४५ च्या सुमारास घडला. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर मौजे गांधारपाले हद्दीत आयशर टेम्पोवरील चालक वैभव राजाराम बेनकर (वय – ३२ राहणार रत्नागिरी) हा गोवाकडून मुंबईकडे जात होता. मौजे गांधारपाले येथे अचानक समोरून मुंबईकडून गोवा दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

त्याचा सहकारी मनीष शामसुंदर मस्के (वय ३२ रा.संगमेश्वर) हा जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून टेम्पोचालकाला महामार्ग पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर टेम्पोतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय महाड येथे पाठवण्यात आले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यामध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. असून अपघाताचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाणेमार्फत सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी केल्यानंतर उशिरा रात्री ही अवजड वाहने प्रवास करीत असतात.

RELATED ARTICLES

Most Popular