24.9 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर 'जामनगर-तिरुनेलवेली' एलएचबी रेकसह धावणार

कोकण रेल्वे मार्गावर ‘जामनगर-तिरुनेलवेली’ एलएचबी रेकसह धावणार

जामनगर तिरुनेलवेली ही कोकण रेल्वे मार्गे आठवड्यातून दोनदा धावणारी एक्सप्रेस आता एल एच बी डब्यांसह धावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचे पूर्वीचे जुने रेक बदलून त्या ऐवजी आधुनिक श्रेणीतील एलएचबी रेक पुरवण्यात आले आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या आता मोजक्याच गाड्या या पारंपरिक रेकसह धावत आहेत. जामनगर- तिरुनेलवेली तसेच हापा -मडगाव मार्गावर धावणाऱ्या गाड्या देखील आता नव्या एलएचबी रेकसह धावणार आहेत. जामनगर तिरुनेलवेली ही कोकण रेल्वे मार्गे आठवड्यातून दोनदा धावणारी एक्सप्रेस आता एल एच बी डब्यांसह धावणार आहे.

जामनगर-तेरूनेलवेली एक्सप्रेस जामनगर येथून २६ ऑगस्ट च्या फेरीपासून तर तिरुनेलवेली ते जामनगर या मार्गावर धावताना २९ ऑगस्ट च्या फेरीपासून एलएचबी रेक सह धावणार आहे. हापा -मडगाव दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीचे जुने आयआर एस बनावटीचे डबे बदलून आता एलएचबी करण्यात आले आहेत. ही गाडी ३० ऑगस्ट रोजी हापा येथून सुटताना एल एच बी रेक्सह धावणार आहेत तर मडगाव येथून हापा कडे जाताना ती १ सप्टेंबर २०२३ च्या फेरीपासून एलएचबी श्रेणीच्या डब्यांसह धावणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular