आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे चिपळूण आणि देवरुख पालिकेच्या विविध विकासकामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये चिपळूणसाठी ६ फोटो, तर देवरूखसाठी ४ कोटींचा रकमेचा समावेश आहे. याशिवाय ग्रामविकास विभागाच्या २५-१५ मधील साडेसात कोटीच्या कामांची स्थगिती उठवण्यात आली. तसेच प्रादेशिक पर्यटक योजनेतील १५ कोटींच्या विकासकामांची स्थगिती उठल्याने ही कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा इतर आहे. महाविकास आघाडीचे सरकार गडगडल्यानंतर आमदार निकमांनी मंजूर केलेल्या विविध विकासकामांना शासनाने स्थगिती दिली होती मात्र अलिकडेच राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमांनी पाठिंबा दिला. त्यामुळे थंडावलेल्या विकासकामांसाठी निधीचा ओघ सुरू झाला आहे.
चिपळूण पालिकेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळाल्या ६ कोटी निधीतून विविध विकासकामांचे नियोजन आहे. यामध्ये गोवळकोट किल्ला येथील कब्रस्तान पाखाडीसाठी आणि गोवळकोट बांद्रे घर ते भैरवकरवाडी लादीकरणासाठी १४ लाख, गोवळकोट गणेशमंदिर येथे सुशोभीकरण व भैरवकरवाडी येथील पाखाडीसाठी १० लाख, बहादूरशेख मोहल्ला येथील कब्रस्तानशेड आणि बेबल मोहल्ला जुम्मा मस्जिद कब्रस्तान अंतर्गत रस्त्याला लादीकामासाठी १० लाख, बेबल मोहल्ला येथील सरंक्षक भिंत व महाराष्ट्र हायस्कूलमधील विज्ञान प्रयोगशाळेसाठी १३ लाख, मुरादपूर मोहल्ला कब्रस्तान रस्त्यास पेव्हर ब्लॉक, कंपाऊंड वॉल आणि महाराष्ट्र हायस्कूलच्या मागील गटार कामासाठी १७ लाख, दादर मोहल्ला कब्रस्तान सुशोभीकरण गोवळकोट रोड मुख्य कास्तान व मार्कडीतील रस्ता डांबरीकरणासाठी ५९ लाख आदी कामांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
देवरुख परशुरामवाडी येथील श्री फेज लाईन बदलणे व नवीन टाकणे, मोरवाडी समाजमंदिर बांधणे, रामेश्वर मंदिर येथील पाखाडी, भंडारवाडी येथील सुशोभीकरण त्याचबरोबर देवरूखमधील विविध भागातील गटारे, सरक्षक भिंती, गणेश विसर्जन घाट, स्वच्छतागृह, शौचालय बांधकाम, स्ट्रीटलाईट, व्यायामशाळा साहित्य, रस्ता डांबरीकरण आदी कामासाठी ४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे, याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली.