21.9 C
Ratnagiri
Thursday, January 23, 2025

परशुराम घाटात गॅबियन वॉल, लोखंडी जाळ्या काँक्रिटीकरण खचले…

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक दरडी व...

चिपळूण, सावर्डेत बांगलादेशींचे वास्तव्य पोलिसांची शोधमोहीम थंडावली

चिपळूणसह सावर्डे परिसर बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा बनला...

पावस बसस्थानकाचे सुशोभीकरण निकृष्ट…

ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावस बसस्थानक इमारतीला...
HomeRatnagiriकोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर

कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर

जांभुळांनी मे महिन्यात येणाऱ्या चाकरमानी, पर्यटक, कोकण रेल्वे प्रवासी यांना भुरळ घातली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील निवसर गाव जांभूळ गाव म्हणून नावारूपाला आले आहे. कोकण रेल्वेप्रवासी यांनी निवसरच्या जांभूळ या कोकणी मेव्याला मोठी पसंती दिली आहे. हंगामी रोजगार जांभुळ विक्रीतून निवसरमधील अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वडिलोपार्जित बहुसंख्य जांभूळ झाडे निसर्गनिर्मित निवसर गावात आहेत. पूर्वी दुर्लक्षित असलेली जांभूळ कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर निवसरच्या जांभुळांनी मे महिन्यात उन्हाळी सुटीसाठी गावी येणाऱ्या चाकरमानी, पर्यटक, कोकण रेल्वे प्रवासी यांना भुरळ घातली आहे.

कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर पोहोचली आहेत. या जांभळांची चव रेल्वे प्रवाशांना आवडली आहे. निवसर-शिंदेवाडी, घाटकरवाडी, धावडेवाडी, आदी परिसरात जांभळाची वडिलोपार्जित अनेक झाडे आहेत. दरवर्षी परिसरातील ३० ते ३५ कुटुंबांना जांभूळ विक्रीतून रोजगार मिळत आहे. औषधी आणि पोषक फळ असल्याने या फळाला मोठी मागणी आहे. दिवसाला जांभूळ विक्रीतून पाचशे ते सातशे रुपये रोज मिळत असल्याची शिंदेवाडीतील आजी सुवर्णा शिंदे यांनी सांगितले. आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेल्वे परिसरात असतो.

निवसर छोटे स्टेशन असल्याने केवळ क्रॉसिंगच्या वेळी थांबणाऱ्या ट्रेनमध्येच जांभूळ विक्री होते. निवसर येथे दिवा पॅसेंजर ही एकमेव गाडी थांबते. इतर सर्व गाड्या क्रॉसिंगला थांबविल्या जातात. जांभळाच्या झाडामागे ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळू शकते. मानांकनासाठी प्रयत्न व्हावेत माजी सरपंच अशोक शिंदे यांनी निवसर येथील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. निवसर गावात जांभळाची शेकडो झाडे आहेत. नव्याने झाडांची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular