26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeKhedकशेडीत अवजड वाहतुकीला अखेर 'ब्रेक'

कशेडीत अवजड वाहतुकीला अखेर ‘ब्रेक’

अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा मजबूत हाईट खांब उभारले.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणाऱ्या अवजड वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा मजबूत हाईट खांब उभारले. यामुळे अवजड वाहतुकीला अखेर ब्रेक लागला आहे. कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वाहतुकीसाठी खुला झाला होता; मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग घडत होते.

अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती. यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी हाईट खांबचा अवलंब करण्यात आला; मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसांतच उखडले. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांबची उभारणी करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केली. तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेलनजीक व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे मजबूत हाईट खांब उभारले आहेत.

याशिवाय दोन्ही बाजूला अवजड बॅरिकेट्सही लावले आहेत. यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे. कशेडी बोगद्यातून दुतर्फा हलक्या वाहतुकीसाठी केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच मुभा देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular