25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriलांज्यात जागेच्या वादातून जेसीबी घरावर चालवला, दोघांना अटक

लांज्यात जागेच्या वादातून जेसीबी घरावर चालवला, दोघांना अटक

घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे नुकसान आणि नासधूस केल्याच्या घटनेप्रकरणी तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथील जागा मालक आणि जेसीबी चालक अशा दोघांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत घरातील महिलेला शिवीगाळ करत हात धरून महिलेला घरातून बाहेर काढल्याप्रकरणी शनिवारी २० जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

जोपर्यंत संबंधित व्यक्तींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर सायंकाळी यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे व जेसीबी चालक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथील वसंत बेंद्रे आणि मच्छिंद्र महेंद्र कांबळे हे एकमेकांशी शेजारी राहणारे असून त्यांच्यात जमीन जागेवरून वाद निर्माण झाला. शुक्रवारी १९ जानेवारी रोजी फिर्यादी वसंत बेंद्रे हे कार्यकारी दंडाधिकारी लांजा येथे आले असताना यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे, दया शंकर कांबळे, दीप्ती महेंद्र कांबळे यांनी जमीन जागेच्या वादाच्या कारणावरून संगनमताने वसंत बेंद्रे यांच्या घरी जावून त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी सौ. प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला शिवीगाळ करत हात धरून घरातून बाहेर काढले.

पुन्हा घरात घुसलीस तर तुझे इथेच काम करून टाकू अशी धमकी देखील दिली. त्यानंतर त्यांनी आणलेल्या जेसीबीद्वारे क्र. (केए २८ – एमए – ३१०१) वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी वसंत बेंद्रे यांनी लांजा पोलीस ठाण्यात शुक्रवारी १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरा पोलिसांनी, चौघां विरोधात गुन्हा दाखल केला, होता. त्यानंतर शनिवारी २० जानेवारी, रोजी या घटनेप्रकरणी शिवसेना उद्धव, बाळासाहेब ठाकरे गढ़ाचे पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत यातील दोषर्षीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.

त्यानुसार पोलिसांनी यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे (३३ वर्षे, रा. कोचरी बौद्धवाडी) आणि जेसीबी चालक अनिल घनू लमानी (३० वर्षे, सध्या राहणार केळंबे स्टॉप, मूळ राहणार हरकेरी तांडा नंबर दोन, तालुका, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक) या दोघांवर भा.द.वि. कलम ३५४, ४५२, ४५१, ३४१, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular