जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात मोठी वाढ केली. या. दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र, या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात झाला आहे. कारण, जिओ, एअरटलेच्या दरवाढीनंतर ग्राहकांनी आपली पावलं बीएसएनएलकडे वळवल्याचं दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आता बीएसएनएलला प्राधान्य देत सिम कार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या जून महिन्यापासून बीएसएनएलकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
यासोबतच बीएसएनएलने जूनपासून ४जी बेस ट्रान्सीव्हर स्टेशन बसवण्याचा स्पीड सुद्धा वाढवला आहे. पूर्व उत्तरप्रदेशात आणखी ५५०० बीटीएस बसवले जात आहेत. बीएसएनएल ४ जी सेवेच्या अपेक्षा वाढल्याने ग्राहकांनी आता सरकारी टेलिकॉम कंपनीची सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. २८ जून रोजी खासगी क्षेत्रातील जिओ, एअरटेल आणि या प्रमुख कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात मोठी वाढ केली. त्यापाठोपाठ वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीने सुद्धा आपल्या रिचार्ज प्लानच्या किमतती वाढ केली. यामुळे ग्राहकांनी बीएसए- नएलला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.