28.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeTechnologyजिओ आणि एअरटेलचा एकत्रित करार

जिओ आणि एअरटेलचा एकत्रित करार

हा करार एक पूर्णपणे नेटवर्क स्ट्रेटजी असून, या करारानंतर रिलायन्स जिओचे, स्पेक्ट्रम डीलनंतर चांगल्या पायाभूत सुविधांच्या तैनातीसह आरजेआयएलने आपली नेटवर्क क्षमता आणखी वाढविली आहे.

देशातील दूरसंचार क्षेत्रातील दोन मोठ्या प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायंस जिओ आणि एअरटेलने एक मोठा करार पास केला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये जवळपास १५०० कोटी रूपयांचा करार करण्यात आला आहे. या कराराबाबत रिलायन्स जिओनं माहिती दिली आहे व या कराराचा फायदा विशेषत: मुंबई, दिल्ली, आंध्र या सर्कल्स मधील ग्राहकांना होणार आहे.

हा करार मुंबई, दिल्ली, आणि आंध्र प्रदेश सर्कलमधील ८०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी करण्यात आलेला आहे. या कराराचं एकूण मूल्य १४९७ कोटी रूपये इतकं जास्त आहे. या तिन्ही सर्कलमधील ग्राहकांना या करारानंतर उत्तम नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे. रिलायन्स जिओ या कराराद्वारे एअरटेलला १०३७.६ कोटी इतके रूपये देईल. तसंच जिओ स्पेक्ट्रमशी निगडीत ४५९ कोटी रूपयांची भविष्यातील लायबिलिटीजही आधीच देणार आहे. भारती एअरटेलनं याबाबत माहिती शेअर केली आहे. या कराराअंतर्गत एअरटेल रिलायन्स जिओला मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्लीतील आपले ८०० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमचे अधिकार देणार असल्याचं एअरटेलने सांगितलं. या अंतर्गत रिलायन्स जिओला मुंबईत २.५० मेगाहर्ट्झ, दिल्लीत १.२५ मेगाहर्ट्झ, आंध्र मध्ये ३.७५ मेगाहर्ट्झ इतकी अधिक स्पेक्ट्रमचा वापर करण्यास मिळणार आहे. सध्या या कराराला नियामक मंडळाची मंजुरी मिळलेली नाही आहे.

तिन्ही सर्कल्समध्ये ८०० मेगाहर्ट्झच्या ब्लॉक्सच्या न वापर होणार्या व्हाल्युचे विक्रीतून कंपनीनं ती व्हॅल्यू युटिलाईझ केली आहे. रिलायन्स जिओनं म्हटल्याप्रमाणे स्पेक्ट्रममध्ये वाढ झाल्यानं त्यांची नेटवर्कची कॅपिसिटी उत्तम होऊन वाढणार आहे. तसंच या करारानंतर रिलायन्स जिओकडे मुंबई सर्कलमध्ये २X*१५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम, आंध्र प्रदेशात ८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये 2X*१० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम उपलब्ध होईल. यामुळे रिलायन्स जिओची नेटवर्क क्षमता वाढून उत्तम सेवा देण्यास मदत मिळणार आहे. जिओ आणि एअरटेल यांच्यात होणार्या या स्पेक्ट्रम करारानंतर रिलायंस जिओ ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळणार आहे. परंतु याचा फायदा फक्त आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईतीलच ग्राहकांना घेता येणार आहे. एअरटेलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल म्हणाले आहेत की, या तीन मंडळांमध्ये 800 मेगाहर्ट्झ ब्लॉक विकून कंपनीने वापर हॉट नसलेले आपले मूल्य वापरले आहे, हा करार एक पूर्णपणे नेटवर्क स्ट्रेटजी असून, या करारानंतर रिलायन्स जिओचे, स्पेक्ट्रम डीलनंतर चांगल्या पायाभूत सुविधांच्या तैनातीसह आरजेआयएलने आपली नेटवर्क क्षमता आणखी वाढविली आहे. म्हणजेच स्पेक्ट्रम-आधारीत सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने मार्चच्या सुरुवातीला स्पेक्ट्रमच्या विक्रीत सर्वाधिक जास्त बोली लावली होती. कंपनीने 800 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2300 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 488.35 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम इतकी 57,100 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular