29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeRatnagiriकोकणातील कोरोनाविरहीत एक गाव

कोकणातील कोरोनाविरहीत एक गाव

एकीच्या बळावर आणि वेळोवेळी करणाऱ्या जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.

सध्या जगभरामध्ये कोरोनाचा वाढता संसर्गाचे वृत्त पसरले आहे. त्यामुळे अगदी लहान गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत विशेष काळजी घेतली जात आहे. चाकरमानी कोरोनाच्या भीतीमुळे गावाकडे वळू लागले आहेत. आपल्या गावच्या वेशीबाहेरचं कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना स्थानिक स्तरावर आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि गावकरी एकत्रित मिळून करत आहेत. तरीही कोरोनाचा शिरकाव कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतोचं आहे. गेल्या वर्षभर कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक गाव आणि शहर एकत्र मिळून लढा देत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे लक्षण दिसत नाही.

जगभर असलेला कोरोनाचा विळखा बघता गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण नाही हे ऐकायला मिळाले तर नवलच म्हणायचे. परंतु, हे सत्य असून हे करून दाखवले आहे कोकणातील एक गावाने. चिपळूण तालुक्यातील आगवे गाव आहे जिथे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत दिसताना या आगवे गावाने मात्र कोरोनाला अजूनही गावात संक्रमण करू दिले नाही. अद्याप या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाअंतर्गत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोन विरहीत गाव म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील आगवे ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले आहे. एकीच्या बळावर आणि वेळोवेळी करणाऱ्या जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. आगवे गावामध्ये ग्रामपंचायतीची कामेसुद्धा एकत्रितरीत्या येऊन केली जातात. या गावात असणारी एकी मोठी ठरली असून, त्याचा फायदा या कोरोनाच्या भयंकर परिस्थिती काळामध्ये झाला आहे. फ्रंट वर्क्रसनी वेळोवेळी घरोघरी फिरून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक तापमान व ऑक्सिजन लेवल मोजत प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती घेतली.

आज या गावाने कोरोनाच्या लढ्यात यश मिळविले आहे ते नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात करावी लागली. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या  संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेचे फार मोठे साहाय्य झाले. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीने कोरोनाचे केलेले गावामधील सर्वेक्षण, कोरोनाची चाचणी, गावासाठी मदत केलेल्या विविध सेवाभावी संस्था,  विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मिळलेला निधी आणि साहित्य, कोरोनामुळे झालेला मृत्यू, सारी चे रुग्ण इत्यादी निकषांवर आधारित अव्वल तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये शासनातर्फे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ स्तरावर हा गौरव करण्यात आला. यामध्ये चिपळूण मधील आगवे गावाने पहिला  क्रमांक पटकाविला. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या ग्रामपंचायतीला रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular