27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeMaharashtraशरद पवार यांच्यावर केलेल्या हीन टीकेमुळे, राष्ट्रवादीकडून केतकी चितळेवर कारवाईची मागणी

शरद पवार यांच्यावर केलेल्या हीन टीकेमुळे, राष्ट्रवादीकडून केतकी चितळेवर कारवाईची मागणी

शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे. यामध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत.

टेलीव्हिजन अभिनेत्री केतकी चितळे ही कायमच तिच्या अतिस्पष्ट आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीने तिच्या फेसबूकवर एका व्यक्तीची कविता शेअर करत पवारांवर चांगलाच निशाणा साधला आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे.

केतकी चितळे ही मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री असून बऱ्याच काळापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती आपल्या सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधानं करताना दिसून आली आहे. त्यामुळं तिला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं आहे.  या पोस्टमध्ये तिने शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे. यामध्ये “ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक” असे शब्द वापरण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेल ला तक्रार दाखल केलेली आहे. केतकी चितळे नावाची ऐक बाई गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळेला फेसबुक वरती आपल्या वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे जेष्ठ नेत्यांबद्दल / राष्ट्रपुरुषांबद्ददल आपली गरळ ओकत असते. चित्रपट सृष्टीमध्ये काम न मिळाल्यामुळे ही बाई अत्यंत वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये कुठेतरी आपल्याला महत्त्व मिळावे म्हणून वारंवार महाराष्ट्राचा अपमान करीत असते. असे देखील म्हणण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी.  ॲड नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने तिच्या फेसबुक वरुन मांडली. या पोस्टमुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील “लवकरच चोपाची गरज आहे हिला ” असं म्हणत विरोध दर्शवला आहे

RELATED ARTICLES

Most Popular