24.6 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeKhedअतिवृष्टीमुळे दाभीळ गावात घरावर दरड, सुदैवाने जीवित हानी टळली

अतिवृष्टीमुळे दाभीळ गावात घरावर दरड, सुदैवाने जीवित हानी टळली

तालुक्यातील दाभीळ येथे एका घरावर दरड कोसळून लाखोची हानी झाली तर दरडी मुळे कार व दुचाकी दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यासह  संपूर्ण कोकणाला पावसाने झोडपले असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने मंगळवारी अतीच उग्र रूप घेतल्याने, दोन दिवस तुफान पावसाने अवघ्या तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यातील दाभीळ येथे एका घरावर दरड कोसळून लाखोची हानी झाली तर दरडी मुळे कार व दुचाकी दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत. घडलेल्या दुर्घटने दरम्यान एक २० वर्षीय युवती थोडक्यात बचावली त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. मंगळवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली.

गेल्या दोन दिवसा पासून दमदार पाऊस सुरु झाला असून, मंगळवारी देखील पावसाचा जोर दिवसभर कायमच राहिल्याने दाभीळ येथील संतोष राठोड यांच्या मालकीचे असलेल्या घरावर दुपारच्या सुमारास अचानक घरानजीक असलेली दरड कोसळून घर या दरडी खाली गाडले गेले. त्यामध्ये घरा समोर उभी असलेली एक कार व दुचाकी दरडी खाली अडकल्या. या घरामध्ये असलेली २० वर्षीय युवती स्नेहा राठोड हिने दरड कोसळत असल्याचे तिच्या लक्षात आले असता ती धावत घराबाहेर पडल्याने तिचा जीव वाचला.

दरम्यान, या घटने मध्ये सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी घर दरडी मध्ये पूर्णता उध्वस्त झाल्याने लाखो रुपयांची हानी होत राठोड कुटुंबीय बेघर झाले आहे या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटना स्थळी दाखल होत मदत कार्य केले सांयकाळी उशिरा पर्यत हे मदत कार्य सुरु होते घडलेली घटना हि तालुक्यातील पहिलीच घटना ठरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular