27.9 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeKhedगणपतीचे डेकोरेशन करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

गणपतीचे डेकोरेशन करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली.

कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे गणेशोत्सव. गणपतीच्या स्वागतासाठी कोकणासह सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. मुंबई पुण्याहून अनेक चाकरमानी सणासाठी गावी दाखल होतात. मात्र, गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्व तयारीला डेकोरेशन करत असताना आयनी शेरी घागुर्डेवाडी येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश रघुनाथ जाधव असे त्या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

३० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास रुपेश हा आई , दोन मुले, पत्नी यांच्या मदतीने राहत्या घरी गणपतीचे डेकोरेशन करत होता. अचानक विजेचा शॉक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांच्या आतल्या घरात रुपेश पडलेला दिसला यावेळी त्याच्या बोटाला जोरदार शॉक लागल्याचे लक्षात येताच तात्काळ धावपळ करण्यात आली.

हा प्रकार त्यांनी जवळ असलेल्या नातेवाईकांना कळवला यावेळी त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी लोटे येथील परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वी त्याचा मृत्यी झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या हौशीप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे विविध प्रकारची सजावट, लाईटिंग , डेकोरेशन, देखावे तयार करत असतात. परंतु, सगळीकडेच विजेची कामे आणि डेकोरेशन सुरु असल्याने काही न काही अडचणी निर्माण होतातच. आणि ऐन सणाच्या धामधुमीत घरातील उमद्या तरुणाचे असे निधन झाल्याने सर्व गावावारच शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular