25.7 C
Ratnagiri
Sunday, September 7, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeKhedघाणेखुंट येथील सर्व्हिस रोडच्या कामाला गती, परंतु व्यापाऱ्यांची नाराजी

घाणेखुंट येथील सर्व्हिस रोडच्या कामाला गती, परंतु व्यापाऱ्यांची नाराजी

मूळ बाजारपेठ व महामार्ग यामध्ये समतोल राखण्यासाठी ठेकेदाराने गावातील रस्त्यांची पाच फुटाहून अधिक खोदाई केली.

मुंबई-गोवा चौपदरीकरणातील रखडलेल्या कामातील खेड तालुक्यातील लोटे- घाणेखुंट येथील सर्व्हिस रोडच्या कामाला गती मिळाली आहे. पावसाचे वेध लागले असून, पाऊस वाढण्याआधी अंडरपाससह हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे काम बाजारपेठेला उपयुक्त नसल्याने व्यापाऱ्यांची नाराजी कायम दिसून येत आहे.

खेड तालुक्यातील लोटे – घाणेखुंट येथील महामार्गाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. काम सुरू झाल्यानंतर येथील रहदारीचा विचार करता रहिवाशांनी अंडरपासची मागणी केली होती. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून येथे अंडरपास रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, त्याची उंची राखण्यात ठेकेदाराने गोंधळ केल्याचे ग्रामस्थांच्या नजरेस आले आहे. परिणामी रस्त्याचे काम झाल्यानंतर ठेवण्यात आलेला अंडरपास बाजारपेठेला त्रासदायक ठरू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मूळ बाजारपेठ व महामार्ग यामध्ये समतोल राखण्यासाठी ठेकेदाराने गावातील रस्त्यांची पाच फुटाहून अधिक खोदाई केली. त्यामुळे आता सर्व्हिस रोड आणि बाजारपेठ यामध्ये अंतर दिसू लागले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला; पण महामार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता काहीच पर्याय नसल्याचे समोर आले आहे. आता ठेकेदाराकडून घाणेखुंट जाणाऱ्या रस्त्याचीही पाच फूट खोदाई करून अंडरपासला मार्ग काढण्याचे काम सुरू आहे.

रस्त्यासाठी खोदाई केल्यानंतरही तब्बल २५ दिवस काम बंद होते. पावसाळ्यापूर्वी अंडरपाससह सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करणार असल्याचे कल्याण टोलवेज कंपनीच्या कामगारांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, रस्ता खाली आणि बाजारपेठ वर असे चित्र येथे निर्माण झाल्याने त्याचा फटका बाजारपेठेला बसणार असल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular