26.7 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeKhedखेडच्या शाखा अभियंत्याला पाठवणार सक्तीच्या रजेवर

खेडच्या शाखा अभियंत्याला पाठवणार सक्तीच्या रजेवर

हा शाखा अभियंता लोकप्रतिनिधींना अतिशय खालच्या दर्जाची अपमानास्पद वागणूक देतो. तसेच मनमानी कारभार करतो, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

खेडमधील एका शाखा अभियंत्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. मनमानी कारभार, लोकप्रतिनिधींना अपमानास्पद तुच्छ वागणूक असा आरोप करत या अभियंत्याला सक्तीच्या रजेवर तसेच त्याची विभागीय चौकशी लावण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. खेडमधील शाखा अभियंता खाचे यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत सभेमध्ये जोरदार गोंधळ उडाला.

जि.प.च्या हिंदू सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे सभागृहात सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर,  जि.प. सदस्य रचना महाडिक, समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम, स्वरुपा साळवी, संतोष थेराडे, अण्णा कदम, रोहन बने, बाळकृष्ण जाधव, विनोद झगडे आदी उपस्थित होते. ही सभा या बॉडीची शेवटची ठरणार आहे. कारण २० मार्च रोजी यांची मुदत संपत आहे. २१ मार्चपासून जि.प.वर प्रशासक असणार आहे, त्यामुळे या सभेकडे लक्ष लागले होते.

या सभेमध्ये मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यातील सर्व सदस्य आक्रमक बनले असून, हा शाखा अभियंता लोकप्रतिनिधींना अतिशय खालच्या दर्जाची अपमानास्पद वागणूक देतो. तसेच मनमानी कारभार करतो, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. अनेकदा समज देऊन सुद्धा काहीच परिणाम न झाल्याने अनेकंच्या तक्रारी असल्याने शेवटी या अभियंत्याला त्वरीत सक्तीच्या पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच त्याची विभागीय चौकशीसुद्धा करण्याचे ठरवण्यात आले. येत्या आठवडाभरात ही चौकशी पूर्ण होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular