23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedमंदिरांमधील दानपेट्या फोडण्याचे सत्र सुरूच, पोलिसांसमोर आव्हान

मंदिरांमधील दानपेट्या फोडण्याचे सत्र सुरूच, पोलिसांसमोर आव्हान

खेड तालुक्यातील चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे बंदिस्त झाले आहेत.

ऐन गणेशोत्सवात खेड व दापोली शहर आणि इतर तालुक्यांमध्ये मंदिरांच्या दानपेट्या फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. गणेशोत्सवादरम्यान आयोजित केलेले विविध कार्यक्रम पाहण्यात दंग असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी आपले सारे लक्ष ग्रामदेवतांच्या मंदिरातील दानपेट्यांवर केंद्रित केले आहे.

दोन दिवसांपूर्वी एकाच रात्रीत चोरट्यांनी कोरेगाव येथील धावजी बाबा मंदिर येथे चोरी झाली. आठवडयाभरापूर्वी दापोली तालुक्यात वणंद, चंद्रनगर, लाडघर या गावातील देवळांमध्ये एकाच दिवशी दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. हे सत्र अद्याप सुरूच आहे. गणेशोत्सवानंतर लवकरच काही दिवसांनी नवरात्र उत्सव होणार आहे. अशावेळी काही अवैद्य धंद्यांनाही चाप बसणे आवश्यक आहे.

कोकण सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाला आहे. परंतु, अलीकडे गेल्या १५ दिवसात मंदिरांमधील दानपेटयांवर चोरांची नजर पडली असून दानपेट्या फोडण्याचे सत्र सुरू झाल्याने अनेक ठिकाणी ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खेड, गुहागर तालुक्यातही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशा चोरांना शोधून काढत त्यांना अद्दल घडवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

खेड तालुक्यातील चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे बंदिस्त झाले आहेत. पोलीस सिसिटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत. चोरट्यांनी एकाच रात्रीत कोरेगाव, चिंचघर, धामणी आणि तिसे येथील मंदिरातील दानपेट्या फोडून दानपेटीतील रक्कम लांबविल्याचे उघड झाले आहे. दापोली शहरात वडाचा कोंड येथील चक्क प्रमुख राज्य मार्गालगत असलेल्या श्री महापुरुष मंदिरात दानपेटी फोडण्यात आली आहे.

देवळांमध्ये समाज कंटकांकडून दानपेट्या फोडण्याचे प्रकार घडत आहेत. या चोरट्यांना ताबडतोब अटक व्हावी, तसेच अवैध धंदे पोलिसांनी त्वरित बंद करावेत, अन्यथा पुढील १५ दिवसांमध्ये खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular