27.5 C
Ratnagiri
Tuesday, December 3, 2024

एकनाथ शिंदेंनी भाजपची झोप उडविली सरकारला बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव?

मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी...

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत...

‘कोरे’चे विलीनीकरण झाल्यास गुंतवणूक सुलभ – अॅड. विलास पाटणे

कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रेल्वे मंत्रालयाने...
HomeKhed३१ डिसेंबरला किल्ल्यांवर, हुल्लडबाजी केलेली खपवून घेतली जाणार नाही

३१ डिसेंबरला किल्ल्यांवर, हुल्लडबाजी केलेली खपवून घेतली जाणार नाही

असा सज्जड इशारा खेडचे वैभव सागवेकर यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे पर्यटकांना दिला आहे.

वर्ष अखेरीस आता काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने आणि मुख्य म्हणजे वर्ष अखेरीला विकेंड येत असल्याने अनेकांची काही दिवस आधीपासूनच सेलीब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायला सर्वच उत्सुक आहेत. अनेक जण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी, कोकण किनारे, गडांवर, ट्रेकिंग, किल्ले भ्रमंती किंवा कुटुंबासह सहलीला जातात.

डिसेंबर महिना अर्धा संपला असून, ३१ डिसेंबर या वर्षाच्या अखेरच्या दिवशी नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण किल्ल्यांना भेटी देत असतात. मात्र किल्ल्यावर गेल्यावर गडाचे पावित्र्य न राखता त्या ठिकाणी हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जात असतो. यंदा मात्र हा धुडगूस खपवून घेतला जाणार नाही. तसे करताना आढळल्यास याद राखा गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशारा खेडचे वैभव सागवेकर यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे पर्यटकांना दिला आहे.

किल्ले रसाळगड मागील काही महिने बंद ठेवण्यात आला होता. पावसाळ्यामध्ये त्याचे सौंदर्य विशेष न्याहारण्यासारखे असते. त्यामुळे सर्वच हंगामात तो पर्यटकांना आकर्षित करत असतो.  मात्र ३१  डिसेंबरचे औचित्य साधून अनेकजण अशा प्रकारचे गड किल्ले पार्टी करायला मोकळ्या जागा शोधत असतात. त्यापैकी किल्ले रसाळगडवर असे प्रकार घडल्यास तो खपवून घेतला जाणार नाही.

तसेच गडावरील मद्यपान व धूम्रपान भरपूर प्रमाणात वाढत आहे. त्याचसोबत गडावर ट्रेंडच्या नावाखाली मुलामुलींची नाचगाणी, मुलींचे अर्धे वस्त्र गडावर परिधान करणे यासारखे प्रकार घडत आहेत. असे काही घडल्यास त्यांना तिथेच चोप दिला जाईल. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखूनच आपले प्लान बनवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular