29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...
HomeEntertainmentकियारा अडवाणीची लग्नातील करवलीबद्दल विशेष इच्छा

कियारा अडवाणीची लग्नातील करवलीबद्दल विशेष इच्छा

कियारा तिच्या एपिसोडमध्ये नेमकं काय बोलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहीलं होतं.

प्रीती-कबीर अर्थात कियारा अडवाणी आणि शाहीद कपूर यांनी २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये उपस्थिती दर्शवली. या एपिसोडमधील छोटासा व्हिडिओ विकी कौशल-सिद्धार्थ मल्होत्राच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आला होता. त्यामध्ये कियाराला तिच्या रिलेशनशिपविषयी विचारण्यात आले होते. त्यामुळे कियारा तिच्या एपिसोडमध्ये नेमकं काय बोलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहीलं होतं.

आता अखेरीस कियारा-शाहीदचा एपिसोड प्रदर्शित झाला असून अभिनेत्रीने तिच्या लग्नाविषयी भाष्य केले आहे. कॉफी विथ करणचा सातवा सीझन सध्या विशेष चर्चेत आला आहे. एकापेक्षा एक एपिसोड प्रदर्शित होत असून, लेटेस्ट एपिसोडमध्ये प्रीती-कबीरची जोडी आलेली पाहायला मिळाली. तिचे लग्नाबाबत काय विचार आहेत, याविषयी ती बोलली आहे

अभिनेत्री लग्नाबाबत सांगताना म्हणतेय की, ‘लग्नसंस्थेवर मी नेहमीच विश्वास ठेवला आहे कारण माझ्या घरात मी काही सुंदर लग्न पाहिली आहेत. त्यामुळे लग्न मी नक्की करणार असले तरी त्याविषयी मी सध्या कॉफी विथ करणमध्ये खुलासा करणार नाही. आणि तुम्हा सर्वांना नक्की निमंत्रण असेल.’ या शोमधील रॅपिड फायर राउंडमध्ये करण कियाराला विचारतो की, कोणत्या अभिनेत्रीला तिला ब्राइड स्कॉड (करवली) मध्ये पाहायला आवडेल. त्यावेळी कियारा आलिया भट्टचे नाव घेते.

टंड ऑफ द इयर’मधून बॉलिवूड पदार्पण करणारे आलिया आणि सिद्धार्थ काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते असल्याचे बोलले जाते. ब्रेकअपनंतर आलिया आणि सिद्धार्थ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले  असून दोघांनी आपापले लाइफ पार्टनर निवडलेत. कियारा जेंव्हा म्हणते की, ‘मला आलिया भट्टला माझ्या ब्राइड स्कॉडमध्ये पाहायला आवडेल. मला ती आवडते, ती खूप गोड आहे’. करणच्या चेहऱ्यावर यावेळी गोंधळलेले हावभाव पाहायला मिळतात.

RELATED ARTICLES

Most Popular