29.8 C
Ratnagiri
Friday, June 6, 2025

सारखाप्यात विजेच्या धक्क्याने वृद्धा ठार, नातू जखमी

साखरपा- जाधववाडी येथील वृद्धेला खांबावरून तुटून लोंबकळणाऱ्या...

चिपळूणमध्ये नव्या इमारतीसाठी आराखडा, तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया

चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे. पालिकेच्या दोन्ही...

आरे-वारे किनारी वाहने नेणाऱ्यांना रोका…

काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यापर्यंत चारचाकी वाहने...
HomeKhedखेडच्या शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार, ठार मारण्याच्या धमकी देणाऱ्या चिठ्या

खेडच्या शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार, ठार मारण्याच्या धमकी देणाऱ्या चिठ्या

२० ते २५ दुकानांसमोर अशा चिठ्या सापडल्याने घबराहट पसरली आहे.

खेडमध्ये एक शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार घडला आहे. शॉपिंग मॉल मधील सर्व दुकानांसमोर ठार मारण्याचा इशारा देणाऱ्या चिठ्या सापडल्या आहेत. शॉपिंग मॉलमधील २० ते २५ दुकानांसमोर अशा चिठ्या सापडल्याने घबराहट पसरली आहे. या चिठ्या कोणी आणि का ठेवल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र गुरुवारी सायंकाळी उशीरापर्यंत तपासात फारशी प्रगती झाली नव्हती. मॉलमधील २० ते २५ दुकांनांसमोर ठार मारण्याचा मजकूर इंग्रजी भाषेत लिहिलेल्या चिठ्या आढळल्या आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या दुकानांसमोर ठार मारण्याचा मजकूर लिहणाऱ्या चिठ्यांमध्ये तारखा मात्र वेगवेगळ्या आहेत.

अमूक दिवशी ठार मारू असे त्या चिठ्यांमध्ये लिहिण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी येथील दुकाने उघडताच या चिठ्या सापडल्याने खेड शहरात एकच खळबळ उडाली. खेड पोलीसांना याची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील व्यापाऱ्यांशी या प्रकाराबाबत चर्चा केली आहे. ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्या या चिठ्या कोणी आणि का लिहिल्या आणि त्या इथे कोणी आणून ठेवल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकारामुळे काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून खेड शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास करत होते. मात्र काही सुगावा लागला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular