31.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

शिवभोजन थाळी योजनेला घरघर, केंद्रे पडली बंद

गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या...

बिले रखडल्याने चिपळुणात ठेकेदारांची बांधकाम कार्यालयावर धडक

ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात येथील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम...

रत्नागिरीतील मच्छिमारांच्या समस्यांकडे राणेंचे वेधले लक्ष

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचा विकास केला जात असून...
HomeRatnagiriमतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल

मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल

ठाकरे गटाने किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ झाला असतानाच, शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू उद्योजक किरण तथा भैय्या सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सकाळपासून दुपारपर्यंत किरण सामंत नॉट रिचेबल असल्याची चर्चा सर्वदूर सुरू होती. मतदान बुथवर देखील हाच विषय चर्चेचा बनला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली असून ठाकरे गटाने किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

मागील आठवड्यात किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयातील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेले बॅनर हटवल्यानेही त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली होती. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये किरण सामंत उदय सामंत यांच्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किरण सामंत यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते कुठे बाहेर गेले आहेत का किंवा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे का, असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.

इशारा समजून घ्यावा – दरम्यान, मतदानाच्यादिवशी किरण सामंत नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू होताच हाहा म्हणता हा विषय सोशल मीडियावर देखील गाजू लागला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिल्या. खा. विनायक राऊत यांनी सांगितले की, किरण सामंत गप्प बसले आहेत याचा इशारा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावा. तर किरण सामंत यांना संरक्षण द्या, असं निवेदन पोलिसांना दिलंय, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. मतदारसंघात याआधी दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतर सुद्धा काही होऊ नये यासाठी पोलिसांनी किरण सामंतांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावे, अशी प्रतिक्रिया आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगितले की, किरण सामंत हे ग्रामीण भागात असल्याने त्यांचा फोन लागत नाही. लांजामधील दुर्गम भागात ते आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular