23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeDapoliकिरीट सोमय्यांच्या ट्वीट आणि दापोली दौऱ्याबाबत वातावरण तंग

किरीट सोमय्यांच्या ट्वीट आणि दापोली दौऱ्याबाबत वातावरण तंग

कोकणातल्या एका राष्ट्रवादी नेत्यानं किरीट सोमय्यांनी कोकणात आगामी दौऱ्याला येऊनच दाखवालं असं थेट आव्हान दिलं आहे.

राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाया आणि किरीट सोमय्यांचे ट्वीट सध्या अधिकच चर्चेत आहे. इतर विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पाठी इडीची कारवाई सुरु असल्यापाठी किरीट सोमय्याच सक्रीय असल्याचे समोर येते आहे.

किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या ट्वीट बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये सोमय्यांनी मिलींद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया, असा इशारा देत, चलो दापोली, असे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्वीटबद्दल सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आजही किरीट सोमय्यानी पुन्हा शिवसेनेला माफिया सेना म्हणून हिणवले आहे. कोकणातल्या एका राष्ट्रवादी नेत्यानं किरीट सोमय्यांनी कोकणात आगामी दौऱ्याला येऊनच दाखवालं असं थेट आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या हे कोकणात येऊन कोकणातल्या पर्यटन व्यवसायिकांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. ते व्यवसायिकांना घाबरवत आहेत, असा आरोप स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तप्त झाल्याचे दिसून येत आहे. सोमय्या यांनी येऊन दाखवावे,  आम्ही त्यांना अडवणारच आणि  त्यांना जशास तसे उत्तर देणार अशी भूमिका माजी आमदार संजय कदम यांनी घेतली आहे.

किरीट सोमय्या २६ तारेखला शक्तीप्रदर्शन करत दापोलीत मोर्चा काढणार आहेत. १००  गाड्यांचा ताफा घेऊन दापोली तालुक्यातील मुरुड इथल्या साई रिसॉर्टवर हा मोर्चा निघणार आहे. त्यामुळे भाजप आमदार किरीट सोमय्या यांचा दापोली दौरा वादग्रस्त ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २६  मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तंग झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular