26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriपाण्याचे टँकर धावू लागले तरी, आराखडा मात्र कागदावरच

पाण्याचे टँकर धावू लागले तरी, आराखडा मात्र कागदावरच

जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आराखडा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटलाच पाण्याची तनाची जाणवू लागल्याने, पाण्याचे टँकरने अनेक गावागावांमध्ये पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ५ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आराखडा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो. त्यानंतर पुढे तो निधीसाठी शासनाकडे पाठविण्यात येतो. परंतु, यावर्षी मात्र रत्नागिरी जिल्ह्याचा अंतिम आराखडा अद्याप तयारच नाही आहे.

फेब्रुवारीमध्येच लांजा तालुक्यात एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू झाला आहे. परंतु मार्च महिना संपत आला तरी दुसर्‍या बाजूला मात्र पाणी टंचाई कृती आराखडा अजूनही तयारच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अजूनही जिल्ह्याचा पाणी टंचाई आराखडा हा कागदावरच राहिल्याने उपाययोजना प्रत्यक्ष राबवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दरवर्षी साधारण जानेवारी महिन्यामध्ये पाणी टंचाईचा आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो. आरंभी तालुक्यांचा आराखडा बनविण्यात येतो. तो एकत्रित करून, जिल्ह्याचा आराखडा बनवला जातो. मात्र यावर्षी तालुक्यातील आराखडेच उशिरा आल्याने जिल्ह्याचा अंतिम आराखडा मंजुरीला विलंब झाल्याच समोर आले आहे. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे दरवर्षी जिल्ह्याला मार्च ते मी या महिन्यात काही प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

यावर्षी वातावरणामध्ये वारंवार घडत असलेल्या बदलामुळे पाऊसच लांबल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी अजूनही मोठ्या प्रमाणात खालावलेली नसल्याचे समजले होते, मात्र गेल्या आठवडाभरापासून वातावरणात वाढलेल्या उष्म्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे पाणी तंचैची समस्या भीषण बनू नये यासाठी त्यावरील उपाययोजनांवर येणार्‍या खर्चाचा समावेश या संबंधित आराखड्यात केला जातो.

RELATED ARTICLES

Most Popular