22.2 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriहवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात १६.४८ मि.मी.च्या सरासरीने एकूण १४८.३० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसंच लांजा, राजापूर, मंडणगड तालुक्यात १० ते १५ मि. मी. पावसाची नोंद झाली.

ऐन गणेशोत्सवात हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खाते कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, ३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. काही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला असल्याने प्रशासनाने किनारी भागासह दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.

हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. थोडीफार उघडीप घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार बरसणार आहे. मुंबई, ठाण्यासह महत्त्वाच्या परिसरामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. लातूर, बीड, नाशिक, परभणी जिल्ह्यातही पाऊस पडला. पण आता लांबलेल्या पावसामुळे पिकं धोक्यात आल्याचे चित्र आहे. पण अशातच आज हवामान खात्याकडून पश्चिम महाराष्ट्रासह, मराठा, विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुन्हा पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, गेले दोन दिवस जिल्ह्यातील उष्णतेमध्ये देखील वाढ झाली आहे. सणाचे दिवस असल्याने संभाव्य नैसर्गिक आपत्तीसह दुर्घटना घडू नये, यासाठी आपत्ती निवारण पथकांना विशेषतः नदी आणि सागरी किनाऱ्यांवर सज्जतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular